Onion

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

बाजारभाव

Onion Rate । सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यापासून कांद्याचे भाव कमी होऊ शकतात. 50 ते 60 रुपये किलोने विकल्या जाणाऱ्या कांद्याचे दर 40 रुपये किलोपर्यंत खाली येऊ शकतात. असे झाल्यास, शेतकऱ्यांना पुन्हा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Central government bans export of onion) घातल्याने कांदा स्वस्त होण्याची अपेक्षा बळावली असल्याचे बोलले जात आहे. (Onion market price)

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी सोमवारी सांगितले की, कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातल्यानंतर त्याच्या किमतीत घट होण्याची अपेक्षा वाढली आहे. त्यावर विश्वास ठेवला तर जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव सध्याच्या ५७.०२ रुपये प्रति किलोच्या सरासरी भावावरून ४० रुपये प्रति किलोपर्यंत खाली येतील. सिंह म्हणाले की, कांद्याच्या वाढत्या किमतीची चिंता करण्याची गरज नाही. त्याची किंमत 60 रुपये किलोच्या पुढे जाणार नाही. त्यांच्या मते, आज सकाळी अखिल भारतीय सरासरी 57.02 रुपये प्रति किलो आहे आणि ती 60 रुपये प्रति किलोच्या पुढे जाणार नाही.

Farmer suicide । धक्कादायक! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; केली आत्महत्या

9.75 लाख टन कांदा निर्यात झाला

2023-24 या आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 4 ऑगस्ट दरम्यान देशातून 9.75 लाख टन कांद्याची निर्यात झाली आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिरातीने भारतातून सर्वाधिक कांदा खरेदी केला आहे. मात्र, चालू खरीप हंगामात कांद्याची व्याप्ती कमी झाल्याने भाव वाढू लागले.

Success story । शहरात सुरु केला वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचा मॉल, लाखात होतेय कमाई, वाचा यशोगाथा

कांदा निर्यातीवर बंदी (Onion export ban)

कांद्याच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून किरकोळ बाजारात 25 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने कांदा विकला जात आहे. तसेच, या वर्षी 28 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत कांदा निर्यातीवर प्रति टन US $ 800 ची किमान निर्यात किंमत (MEP) लागू केली आहे.

Government Apps । कामाची बातमी! तुमच्याही फोनमध्ये नसतील हे सरकारी ऍप्स तर तातडीने करा डाउनलोड, कसलीच अडचण नाही येणार

याशिवाय ऑगस्टमध्ये भारताने ३१ डिसेंबरपर्यंत कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावले होते. त्यानंतरही भावात घसरण होत नसताना सरकारने शुक्रवारी ३१ मार्च २०२४ पर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयाविरोधात आता शेतकरी देखील आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेईल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Success story । इंदापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा! 50 गुंठ्यात चंदन शेतीतुन करोडोची कमाई, जाणून घ्या कस केलं नियोजन?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *