Havaman Andaj

Havaman Andaj । विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज….

हवामान

Havaman Andaj । यंदा पावसामुळे (Rain in Maharashtra) शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. रब्बी हंगामात पावसाने काही भागात पाठ फिरवली तर काही भागात खरीप हंगामात अवकाळी पावसाने (Heavy Rain in Maharashtra) हजेरी लावली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आर्थिक भरपाईची वाट पाहत आहेत. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पावसाची (IMD Rain Update) शक्यता वर्तवली आहे.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

विदर्भासह कोकणात पावसाची शक्यता

मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michong) देशासह राज्याच्या काही भागात पाऊस हजेरी लावू शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासात कोकण, विदर्भात पावसाची शक्यता (IMD Update) आहे. तर काही ठिकाणी थंडी जाणवू लागली आहे. वातावरणातील बदलांमुळे राज्यात यंदा उशिरा थंडी पडली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. (Maharashtra Weather Update Today)

Encroachment land । जमिनीवर अतिक्रमण केल्यास घाबरू नका, ‘या’ ठिकाणी करा दावा, टळेल अतिक्रमण

त्याशिवाय, पुढील 2 ते 3 दिवस दक्षिण भारतातील अनेक राज्यात मुसळधारते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल या भागात हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली आहे. केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. दिल्ली आणि लखनौमध्ये तापमान कमी झाले आहे. पर्वतीय भागात बर्फवृष्टीचा परिणाम उत्तर भारतातील हवामानावर दिसून येत आहे.

Farmer suicide । धक्कादायक! बँकेची नोटीस येताच शेतकऱ्याने घेतला टोकाचा निर्णय; केली आत्महत्या

मुंबईत जाणवणार गुलाबी थंडी

महाराष्ट्राच्या हवामानात सतत बदल होत आहेत. त्यामुळे आता मुंबईत रात्री गुलाबी थंडी पडेल आणि दिवसा उन्हाचा चटका बसेल. राज्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. मुंबईच्या किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट होईल आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे रात्रीचे तापमान 18 ते 19 अंशांपर्यंत खाली येईल.

Success story । शहरात सुरु केला वीस जातींच्या गावरान कोंबड्यांचा मॉल, लाखात होतेय कमाई, वाचा यशोगाथा

दरम्यान, यंदा राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले पीक वाया गेले आहे. शेतकरी आता केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. पिकांची नासाडी झाल्याने भाज्यांचे, धान्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Government Apps । कामाची बातमी! तुमच्याही फोनमध्ये नसतील हे सरकारी ऍप्स तर तातडीने करा डाउनलोड, कसलीच अडचण नाही येणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *