Government Apps

Government Apps । कामाची बातमी! तुमच्याही फोनमध्ये नसतील हे सरकारी ऍप्स तर तातडीने करा डाउनलोड, कसलीच अडचण नाही येणार

शासकीय योजना

Government Apps । आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन (Smartphone) आहे. यामुळे अनेक कामे सोयीस्कर झाली आहेत. स्मार्टफोनमुळे जास्त धावपळ करावी लागत नाही. आज गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) अनेक प्रकारची ऍप्स उपलब्ध आहेत. या ऍप्सच्या मदतीने कामे चुटकीसरशी पूर्ण होतात. परंतु, अशी काही सरकारी ऍप्स (Government App List) आहेत, जी प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये असायला हवी. पहा यादी.

Success story । इंदापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा! 50 गुंठ्यात चंदन शेतीतुन करोडोची कमाई, जाणून घ्या कस केलं नियोजन?

My Gov

सरकारशी डायरेक्ट संवाद करायचा असल्यास तुम्ही My Gov हे ऍप वापरू शकता. सरकारला काही सल्ला किंवा सूचना द्यायच्या असल्यास जसे की ‘मन की बात’ कार्यक्रम मध्ये कोणते टॉपिक डिस्कस व्हायला हवे, अशा सूचना या ऍपच्या (My Gov) माध्यमातून देऊ शकता. या ऍपमध्ये काही क्विझ चालू असतात ज्यात तुम्ही पार्टिसिपेट करून बक्षीस जिंकू शकता. MyGov हे ऍप भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राने विकसित केले असून यावर तुम्हाला सरकारी योजनांची माहिती मिळेल.

Leopard attacks । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात वनमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

Umang App

उमंग ऍपमुळे तुम्ही सरकारी योजनांबद्दल जाणून घेऊ शकता. हे ऍप वापरण्यापूर्वी यात सर्वात अगोदर तुमचे अकाउंट चालू करा. याद्वारे तुम्ही बिल जमा करू शकता. काही तक्रारी करू शकता. पीएफची सर्व कामे, आधार नंबर ऍड करणे किंवा पासबुक चेक करू शकता.सरकारच्या तब्बल 21,815 सर्व्हिसेस या ऍपद्वारा (Umang App) सरकारच्या विविध योजनाबद्दल इथूनच माहिती मिळेल. योजनांसाठी तुमची पात्रता आहे की नाही ते देखील समजेल.

Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर

mAadhar

आधार कार्डला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने mAadhar नावाचे ऍप तयार केले असून या ऍप (mAadhar) द्वारे ग्राहकांना आधार कार्डची सॉफ्ट कॉपी बनवता येईल. आधार कार्ड मधील नाव आणि पत्ता यासारखी माहिती या ऍप द्वारे दुरुस्त करता येते. याद्वारे यूजर आपली ई-केवायसी करू शकतात. एका अकाउंट वर पाच आधार कार्ड डाउनलोड करता येतात. हरवलेले आधार कार्ड डाउनलोड करून त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता.

Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?

DigiLocker

डिजीलॉकर (DigiLocker) एखादया बँक लॉकर सारखेच तुमचे डॉक्युमेंट जतन करून ठेवते. ऍप इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे विकसित केले आहे. यात issued document नावाचे एक मेनू असून यात तुम्ही तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन्स, बोर्ड मार्कशीट वगैरे डॉक्युमेंट सेव्ह करू शकता. डिजीलॉकर वरील सर्व कागदपत्रे सरकारी व गैर सरकारी संस्थांमध्ये व्हॅलीड असतात.

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

mParivahan

हे ऍप महाराष्ट्र परिवहन तर्फे जारी केले आहे. यामागचा मुख्य उद्देश हा आहे की तुम्हाला तुमच्या वाहना संबंधीत विविध प्रकारची कागदपत्रे लागत नाहीत, या ऍप्लिकेशनद्वारे (mParivahan) तुम्ही या सर्व गोष्टी व्हर्च्युअल प्रकारे डाउनलोड करून ठेवू शकता. इतर कोणती माहिती मिळवायची असल्यास तुम्ही mParivahan App द्वारे मिळवू शकता. या ऍप्लिकेशन द्वारे तुम्ही कोणत्याही वाहनाचा नोंदणी क्रमांक टाकून त्या वाहनाची माहिती मिळवू शकता. आरटीओशी निगडित सर्व सुविधांचा घरबसल्या लाभ घेऊ शकता.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *