Success story

Success story । इंदापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा! 50 गुंठ्यात चंदन शेतीतुन करोडोची कमाई, जाणून घ्या कस केलं नियोजन?

यशोगाथा

Success story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे (Modern crops) जास्त कल वाढत चालला आहे. यामधून शेतकऱ्यांना जास्त फायदा होत आहे. परंतु, कोणत्याही पिकाची लागवड (Cultivation of crop) करायची असल्यास गरजेचे आहे ते म्हणजे कष्ट आणि नियोजन. शेतीत विविध प्रयोग केल्याने उत्पन्नांत वाढ होत आहे. कमी क्षेत्रावरही काही शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहेत.

Leopard attacks । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! बिबट्यांच्या हल्ल्यासंदर्भात वनमंत्र्यांचे महत्त्वाचे आदेश

पुण्यातील एका शेतकऱ्याने चंदन शेतीतून (Sandalwood cultivation) करोडोची कमाई केली आहे. विशेष म्हणजे त्याने फक्त 50 गुंठ्यात चंदनाची लागवड (Sandalwood cultivation information) केली आहे. शहाजी धोंडीबा शिंदे (Shahaji Dhondiba Shinde) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पुणे जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील बेलवाडी येते राहतात. या भागातील शेतकरी चंदन, मलबार आणि निलगिरी यांसारख्या झाडांची फारशी लागवड करत नाही. येथे जास्त करून ऊस, डाळिंब, कांदा या पिकांची लागवड केली जाते.

Eggs Rate । थंडी पडताच गगनाला भिडले अंड्याचे दर! प्रति नग ‘इतके’ मिळत आहेत दर

असे केले नियोजन

परंतु, शिंदे पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीने लागवड केली आहे. शिंदे यांनी 2017 मध्ये चंदन लागवड (Sandalwood Plantation) केली. शिवाय त्यांनी 2018 मध्ये चंदनाच्या शेतीत मिलीया डुबिया (Milia dubia) या जातीची झाडांची देखील लागवड केली आहे. दहा वर्षानंतर चंदन हार्वेस्टिंगसाठी तयार होते. म्हणजे येत्या तीन ते चार वर्षात त्यांना चंदनापासुन उत्पादन मिळेल.

Sharad Pawar । मी कृषीमंत्री झाल्यावर पहिली फाईल… नेमकं काय म्हणाले शरद पवार?

शिंदे यांनी सव्वा एकर शेत जमिनीत म्हणजेच 50 गुंठे जमिनीत चंदनाची रोपे लावली. लागवडीसाठी त्यांनी दापोली येथून चंदनाची रोपे खरेदी केली. एकूण 50 गुंठ्यात 330 रोपांची लागवड करून चंदनासोबत त्यांनी मिलीया डुबिया या झाडाची 200 झाडे लावली आहेत. चंदन हे परजीवी असल्यामुळे त्यांनी या झाडांची लागवड केली आहे. शिवाय चंदन आणि मिलिया डुबिया या झाडांसोबत पेरूची लागवड केली आहे.

Onion Export । ब्रेकिंग! दोनच दिवसात घेणार शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय, कृषिमंत्र्यांनी दिली माहिती

किती मिळते उत्पन्न?

पेरूपासून दरवर्षी 35 ते 40 हजारापर्यंतचे उत्पन्न मिळत असून 50 गुंठ्यात लावलेल्या चंदनाच्या झाडांपासून त्यांना करोडो रुपयांची कमाई होईल. मिलीया डुबिया या झाडातून लाखो रुपये मिळतील, अशी आशा शिंदे यांना आहे. परंतु, अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात चंदनाची तस्करी केली जात आहे. त्यामुळे त्यांच्या शेतातील चंदनाची चोरी होऊ नये म्हणून त्यांनी शेतात कंपाऊंड करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत.

Milk Rate Issue । धक्कादायक! मंत्र्यांनीच केली दूध उत्पादकांची बदनामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *