Success story

Success story । शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळावर मात करत गुगल, युट्युबच्या मदतीने फुलविली ड्रॅगन फ्रुटची शेती

यशोगाथा

Success story । आजही अनेकजण पारंपरिक शेती करतात. परंतु त्यातून तुटपुंजे पैसे हाती येतात. महत्त्वाचे म्हणजे त्यालाही दिवसरात्र मेहनत करावी लागते. प्रत्येक वर्षी या पिकांना चांगले उत्पन्न मिळतेच असे नाही. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना पिकांना बाजारभाव न मिळाल्याने पिके फेकून द्यावी लागतात. काही शेतकरी आधुनिक शेतीकडे वळू लागले आहेत. यात चांगला नफा मिळतो.

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

शेतकरी आता ड्रॅगन फ्रुटची (Dragon fruit) शेती करू लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या पिकासाठी जास्त पाण्याची गरज नसते. कमी पाण्यावरही हे पीक येते. बाजारात ड्रॅगन फ्रुटला चांगली मागणी असते. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ममदापूर येथील रामराव गिडगे या शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटची यशस्वी शेती (Dragon Fruit Farming) केली आहे. त्यांनी आपल्या अर्धा एकर शेतीत ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.

Gift Deed । जमिनीचे बक्षीस पत्र म्हणजे काय? ते रद्द करता येते का? जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुगल आणि युट्युबची घेतली मदत

कमी पाण्यावर आधारित आणि दुष्काळातही तग धरू शकेल, अशा पिकांचा रामराव गिडगे अभ्यास करत होते. त्यात त्यांना ड्रॅगन फ्रूटची माहिती मिळाली. परंतु त्यांना याबद्दल फारशी माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या नातेवाईकांसह गुगल आणि युट्युबची मदत घेतली. ड्रॅगन फ्रूट लागवडी केल्यानंतर एक वर्षात फळधारणेला सुरुवात होते आणि त्याचे २० ते २५ वर्षे उत्पन्न मिळते.

Havaman Andaj । परतीच्या मान्सूनला सुरुवात! येत्या ४८ तासांत ‘या’ जिल्ह्यांत कोसळणार मुसळधार

खर्च

रामराव गिडगे यांनी कोळपेवाडी साखर कारखान्याततुन निवृत्ती घेतली आहे. त्यांची ममदापुर येथे 22 एकर शेती आहे, त्यात ते मका, ज्वारी, कापूस, उन्हाळ कांदा यांसारखी पिके घेतात. त्यांचे विहिरींसह शेततळे आहे. परंतु पाऊस नसल्याने शेततळे आणि विहिरीत पाणी नसते. त्यांनी अर्धा एकरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली असून त्यासाठी त्यांना जवळपास 20 रुपयास एक ड्रॅगन फ्रुटची कांडी मिळाली आहे. त्यांनी एकूण 1050 कांड्या खरेदी केल्या आहेत. त्यांना आतापर्यत पावणे दोन लाख रुपयांचा खर्च आला आहे. जुलै महिन्यात त्यांनी ड्रॅगन फ्रुटची लागवड केली आहे.

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *