Havaman Andaj । राज्याकडे ऑगस्ट महिन्यात पाठ फिरवणाऱ्या मान्सूनने सप्टेंबर महिन्यात जोरदार (Rain in Maharashtra) पुनरागमन केले. सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस (Heavy Rain) झाला. त्यामुळे खरीप पिकांना चांगला दिलासा मिळाला. (Heavy Rain in Maharashtra) दरम्यान, मागील आठवड्यापासून हवेतील आर्द्रता कमी झाल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये
अशातच आता मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. याबाबत हवामान खात्याने मोठी अपडेट दिली आहे. राज्यातील ४५ टक्के भागातून मान्सून निघून गेला आहे, असे हवामान खात्याकडून (IMD Alert) सांगण्यात आले आहे. त्यामुळे पुढच्या दोन-तीन दिवसांत परतीच्या पावसाला सुरुवात होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील ४८ तासांत दक्षिण महाराष्ट्र गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे हलका पाऊस पडू शकतो.
Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
पुणे,मुंबईसह नागपुरमधून मान्सून परतला आहे, असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. प्रत्येक वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास राजस्थानमधून १७ सप्टेंबर दरम्यान सुरू होतो. यंदा मात्र मान्सूनने आठवडाभर उशिरा परतीचा प्रवास सुरू केला आहे. राज्यातील इतर भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
Onion Rate । आज कांद्याला सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
परंतु, राज्याच्या काही भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस झाला नाही. दरम्यान, आतापर्यंत जम्मू कश्मीर, राजस्थान, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पश्चिम मध्य प्रदेश आणि गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छ भागातून परत गेला आहे. पुढील दोन ते तीन दिवसात परतीचा प्रवास आणखी वेगाने होईल.
Guar Cultivation । अशा पद्धतीने करा गवार लागवड, होईल बक्कळ कमाई