Paddy Procurement

Paddy Procurement । ‘या’ जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांचे थकले ३१६ कोटी रुपये, नेमकं प्रकरण काय?

बातम्या

Paddy Procurement । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी शेतमालाला बाजारभाव नसतो. अनेक शेतकरी या संकटांमुळे टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. यंदाही राज्यात काहीशी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

E-Crop Registration । आता एकाच ॲपद्वारे ई-पीक नोंदणी सातबारावर होणार; जाणून घ्या

थकले ३१६ कोटी रुपये

अशातच आता एक धक्कादायक बाब समोर आली आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून खरेदी केलेल्या शेतकऱ्यांचे तब्बल ३१६ कोटी रुपयांचे चुकारे थकले असून जिल्ह्यातील ४५ हजार शेतकऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. (Paddy Payment) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने (District Marketing Federation) खरीप हंगामात आतापर्यंत १८३ धान केंद्रावर या माध्यमातून २२ लाख ८० हजार क्‍विंटल धान खरेदी केले आहे.

Hydroponics Technology । धक्कादायक! तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकवला गांजा, पुढं झालं असं काही की…

या धानाची एकूण किंमत तब्बल ४९७ कोटी ८१ लाख रुपये इतकी आहे. यापैकी फक्त १८१ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. हमीभावाने धान खरेदी सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी झाला असून या काळात फक्त दोन वेळा सरकरकडून चुकाऱ्यासाठी मार्केटिंग फेडरेशनला निधी प्राप्त झाला असल्याचे समोर आले आहे.

Farm Pond Scheme । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सरकारकडून २३ हजार शेततळ्यांना मंजुरी

शेतकरी आर्थिक संकटात

त्यामुळे सरकारकडून चुकाऱ्यासाठी निधी मिळाला नसल्याने एकूण ३१६ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. सरकारी धोरणामुळे रब्बी हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे. यामुळे सरकारने लवकरात लवकर याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. नाहीतर शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट निर्माण होऊ शकते.

Artificial Intelligence । आर्टिफिशीयल इंटेलिजन्सवर होणार उसाची शेती? कसं काम करत हे तंत्र? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *