Agri startups

Agri startups । तरुणाचा नादच खुळा! 3 वर्षे शेतीत काबाडकष्ट केले अन् आता उभारली 1200 कोटींची कंपनी

यशोगाथा

Agri startups । सध्या सहजासहजी नोकरी मिळत नाही आणि जरी मिळाली तरी ती फार काळ टिकत नाही. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना लगेचच घरचा रस्ता दाखवतात. त्यामुळे देशासह राज्यात बेरोजगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली आहे. नोकरी नसल्याने तरुण शेती करू लागले आहेत. काही तरुण तर लाखो रुपयांच्या पगारावर लाथ मारून शेती करत आहे. अनेकदा ते शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.

Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण

असाच एक प्रयोग राजस्थानच्या जयपूरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने केला आहे. ऋतुराज शर्मा असे या 33 वर्षाच्या तरुणाचे नाव आहे. या तरुणाने शेतीच्या माध्यमातून आर्थिक प्रगती साधून चक्क करोडो रुपयांची कंपनी (Zettafarms) स्थापन उभारली आहे. झेटाफार्म्स नावाची कंपनी तरुणाने गुडगावमध्ये स्थापन केली आहे. कंपनी कॉर्पोरेट शेती (Corporate Farming) करते. भाडेतत्त्वावर जमीन घेऊन त्यात धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवण्याचे काम चालते.

Agriculture Drone । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेती करण्यासाठी मिळणार ‘ऍग्री ड्रोन’; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

ऋतुराज शर्मा यांनी B.Tech आणि MBA करून नोकरी करण्यापेक्षा Startups (Success story) केला. झेटाफार्म्स हा तिसरा स्टार्टअप असून कृषी क्षेत्रात नवा अध्याय रचला आहे. ही कंपनी कमीत कमी 50 एकर जमीन एका व्यक्तीकडून आणि 100 एकर जमीन एका गटाकडून भाडेतत्त्वावर घेते. त्यानंतर त्या जमिनीवर शेती केली जाते. सध्या कंपनी एकूण 15 राज्यांत 20 हजार एकर जमिनीवर शेती करते. त्यात गहू, हरभरा, धान, कडधान्ये, भाजीपाला, फळे, चहा आणि कॉफी यांसारख्या एकूण 60 पिकांचा समावेश आहे.

Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई

अशी केली सुरुवात

सुरुवातीला ऋतुराज यांनी केवळ 2 एकर शेतीतुन सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी भाडेतत्त्वावर आणि करारावर जमीन घेऊन व्यवसाय वाढवला. त्यांच्या कंपनीला पहिल्या वर्षी 1 लाखांचा नफा झाला. हळूहळू कंपनीला मेहनतीच्या जोरावर उंचीवर नेऊन ठेवले आहे. ते शेतीला एक यशस्वी व्यवसाय म्हणून समोर आणत आहे.

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

कंपनी पीक विविधतेवर काम करते. Zettafarms या कंपनीच्या टीममध्ये ऑपरेशन्स, फायनान्स, मॅनेजमेंट आणि मार्केटिंग मधील सर्व प्रकारच्या लोकांचा समावेश आहे. तंत्रज्ञानात ते हवामान अॅप्स आणि क्रॉप मॉनिटरिंग प्रकारचा डेटा विश्लेषण वापरतात. संसाधनांचा योग्य वापर केल्याने उत्पादन वाढते आणि नफाही वाढतो. शिवाय कंपनी औषधे, खते किंवा किटकनाशके वापरताना ते कीटक व्यवस्थापनाच्या पद्धतीचा वापर करतात.

Success Story । ही 23 वर्षांची मुलगी ओसाड जमिनीतून सोने उगवते, वाचा तरुणीची यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *