Land Rule

Land Rule । काय सांगता! शेतीचा बांध कोरला तर कारवाई होते? महत्त्वाचा नियम एकदा वाचाच

शेती कायदे

Land Rule । जमीन म्हटलं की वाद आलाच. जणू काही जमीन आणि वाद असे नवीन समीकरण तयार झाले आहे. जमिनीवरून सतत दोन भावांमध्ये, बहिणीमध्ये तसेच गावकऱ्यांमध्ये वाद झाल्याचे आपण पाहतो. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात, जमिनीवरून अनेक खटले कोर्टात प्रलंबित असतात. अनेकजण शेतीचा बांध (Agriculture News) कोरतात. समजा कोणी बांध कोरला तर त्याच्यावर कारवाई होते का? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Success Story । ऊसतोड कामगार बनला दोन कोटींचा बागायतदार, जाणून घ्या या शेतकऱ्याची थक्क करणारी कहाणी

एखाद्या शेतकऱ्याने बांध कोरला तर त्याला किती वर्षाची शिक्षा भोगावी लागते? कोणत्या कायद्याअंतर्गत शिक्षा लागू होते? जाणून घेऊयात सविस्तर माहिती. अनेकजण ट्रॅक्टरच्या मदतीने बांध कोरतात. समजा एखाद्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरच्या मदतीने बांध कोरला तर ट्रॅक्टर चालक आणि मालकावर गुन्हा दाखल होतो, अशी कायद्यामध्ये तरतूद केली गेली आहे असे एका व्हायरल मेसेजमध्ये म्हटले आहे.

Agriculture News । शेजारील शेतकरी शेतात पाईपलाइन टाकू देत नसल्यास काय करावे? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

काय म्हणतात महसूल तज्ञ? जाणून घ्या

याबाबत महसूल तज्ञ प्रल्हाद कचरे असे सांगतात, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये शेतीच्या बांधासंबंधीचे वाद मिटवण्याची व्यवस्था असून बांध कोरला तर 5 वर्ष कारावास होईल, अशी शिक्षा नमूद केली नाहीये. जमिनीचा बांध सांभाळणे, ही संबंधित जमीनधारकाची जबाबदारी आहे. समजा इतर कोणी बांध कोरला तर त्या शेतकऱ्याला त्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करता येते.

Success Story । राजकारण सोडून 65 वर्षीय शेतकरी शेतीतून कमावतोय 40 लाख, कसे केले नियोजन? जाणून घ्या…

महसूल कायदा

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार, शेताच्या सीमाबाबत कोणताही वाद नसल्यास जमीन भोगवटा करणाऱ्या व्यक्तीने दाखवल्याप्रमाणे सीमा निश्चित केल्या जातात. त्याबाबत वाद असल्यास भू-मापन अधिकारी जो पुरावा मिळेल. पुराव्यानुसार सीमा निश्चित करण्यात येतात.

Onion Price Hike । कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! कांद्याच्या दरात विक्रमी वाढ

त्यानुसार सीमारेषा सीमा चिन्हाद्वारे आखल्या जातात. एखाद्या व्यक्तीने सीमा चिन्ह किंवा भू-मापन चिन्ह नाहीशी केली तर त्याला नुकसान पोहचवल्याचे जिल्हाधिकारी किंवा भू-मापन अधिकारी यांच्या चौकशीत सिद्ध झाले तर संबंधित व्यक्ती नुकसान पोहचवलेल्या प्रत्येक चिन्हादाखल 100 रुपयापेक्षा जास्त नसेल अशा दंडाच्या शिक्षेस पात्र असतो.

Havaman Andaj । ‘या’ राज्यांत पडणार येत्या २४ तासांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याने दिला सतर्कतेचा इशारा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *