Agriculture News । जमीन (Land) जरी ती शेतजमीन असली किंवा बिगरशेतजमीन असली तरी जमिनीच्या मुद्द्यावरून वाद-विवाद होत असल्याचं नेहमी आपण पाहत असतो. इकतंच नाही तर याच मुद्द्यावरून राज्यभरात लाखो खटले प्रलंबित आहे. अनेकवेळा तर जमीन कसणारा एक असतो, परंतु मालक मात्र दुसराच असतो. शेतकऱ्यांना शेती करताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
Maharashtra Drought । मोठी बातमी! सरकारने केला 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर, केंद्राकडे मदतीसाठी आवाहन
त्यामुळे अनेक शेतकरी बँकेकडून कर्ज (Loan) घेतात. अनेकदा शेतकऱ्यांना कर्ज वेळेत मिळत नाही. नाईलाजाने शेतकरी खाजगी सावकारांकडून कर्ज घेतात. खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदरात कर्ज मिळते, शिवाय अनेक खाजगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी आत्महत्या करतात. तर अनेकदा सावकार जमिनीवर बळजबरी ताबा मिळवतात. परंतु तुम्ही आता जमीन परत मिळवू शकता.
असा करा अर्ज
सावकाराने जमीन बळजबरीने बळकावली असल्यास पंधरा वर्षाच्या आत संबंधित शेतकऱ्याला जिल्हा निबंधकांकडे त्या संबंधीची तक्रार करावी. त्यासाठी तुम्हाला जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये अर्ज गोपनीय पद्धतीने करावा लागेल. तुम्ही ज्या तारखेला संबंधित अर्ज केला असल्यास त्या तारखेपासून पंधरा वर्षे पूर्वी संबंधित जमिनीची रजिस्ट्री झाली असेल तर महाराष्ट्र सावकारी( नियमन) अधिनियम 2014 च्या अंतर्गत शेतकऱ्याला जमीन परत मिळते.
Onion Price । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! दुपटीने वाढल्या कांद्याच्या किमती
यासाठी एका साध्या कागदावर माझ्या जमिनीवर संबंधित व्यक्तीने ताबा मिळवला अशा आशयाची तक्रार करावी लागते. पुरावा म्हणून सावकाराकडून किती कर्ज घेतले आहे आणि त्यावर व्याज यासंबंधीची संपूर्ण माहिती सादर करावी लागते.
अशी होते प्रक्रिया
प्राप्त झालेल्या अर्जाची व्यवस्थित पडताळणी करून पुरावे तपासण्यात येतात. यात घेतलेल्या कर्जावरील व्याजाचे पुरावे, सहीची कागदपत्रे, अक्षरांमधील आकडेमोड अशा बाबी या प्रामुख्याने तपासल्या जातात. सावकारी कायद्यातील कलम 18 अंतर्गत धाड म्हणजे रेड टाकण्याचे अधिकार जिल्हा उपनिबंधक यांना दिले आहेत. सावकार आणि संबंधित शेतकऱ्यांमध्ये जमिनीची रजिस्ट्री पलटून द्यायची बोलणी झाली होती का? यासंबंधीचे साक्षीदार किंवा पुरावे, काही रेकॉर्डिंग असल्यास त्याची तपासणी होते.
सावकार आणि बळकवलेली जमीन संबंधित शेतकऱ्याला म्हणजेच कर्जदाराला परत करण्याचे अधिकार जिल्हा निबंधकांना असून त्यासंबंधीचे आदेश तथा पत्र सब रजिस्टर तसेच लँड रेकॉर्ड्स म्हणजेच भूमि अभिलेख आणि संबंधित तहसीलदारांना पाठवण्यात येतात. यात बळकावलेली जमीन ही संबंधित शेतकऱ्याला परत करण्याचे आदेश असतात.
Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच