Wheat Farming । रब्बी हंगामाची लागवड जवळपास पूर्ण झाली आहे. या हंगामात हरभरा आणि गहू मोठ्या प्रमाणात लागवड (Wheat Cultivation) केला जातो. कारण या काळातील हवामान या पिकांना खूप फायदेशीर असते. योग्य हवामानामुळे उत्पादन भरघोस निघते. देशात जास्त करून गव्हाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. गव्हाच्या विविध जाती आहेत. जास्त नफा मिळवायचा असेल तर योग्य त्या गव्हाच्या वाणाची लागवड करावी.
काही शेतकरी बांधव 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत गव्हाची पेरणी करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, 15 डिसेंबरनंतर गव्हाची पेरणी करू नये. यंदा देशात पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. कमी पावसामुळे यंदा गव्हाची लागवड (Wheat Cultivation Information) घटू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पिकातील पाण्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे लागते. नाहीतर चांगले उत्पादन मिळत नाही, गव्हाची वाढ खुंटते.
असे करा पाणी व्यवस्थापन
मध्यम ते भारी जमिनीत लागवड (Wheat Crop) केल्यास 21 दिवसांच्या अंतराने एकूण पाच पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पेरणीच्या करताना मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी, कांडी धरणे, फुलोरा व चीक भरणे आणि दाणे भरण्याच्या अवस्थेत पाणी द्यावे. पेरणीनंतर एकच पाणी देणे जमत नसेल तर 40 ते 42 दिवसांनी पाणी देऊ शकता. जर शेतकऱ्यांकडे गव्हाच्या पिकासाठी दोन पाणी देण्याइतके पाणी असल्यास 40 ते 42 दिवसांनी आणि 60 ते 65 दिवसांनी पाणी द्यावे.
शिवाय हलक्या जमिनीत गव्हाची लागवड केल्यास पिकाला 15 ते 20 दिवसांनी पाणी द्यावे. हलक्या जमिनीत लागवड केलेल्या गव्हाच्या पिकाला 15 ते 20 दिवसांच्या अंतराने कमी प्रमाणात पाणी द्यावे, असे कृषी तज्ञांचे मत आहे. शिवाय पेरणीनंतर 20 ते 21 दिवसाच्या काळात आणि फुटवे फुटण्याचा अवस्थेत म्हणजे 40 ते 42 दिवसात पाण्याचा ताण पडू देऊ नका. जर तुम्ही या पद्धतीने पाणी दिले तर तुम्हाला चांगले गव्हाचे उत्पादन घेता येईल.
पाण्याच्या उपलब्धतेनुसार व्यवस्थापन
समजा कोरडवाहू भागात गहू पेरणी केल्यास आणि पिकाला एकच पाणी देण्यासाठी पाण्याचा साठा उपलब्ध असल्यास पेरणीनंतर 40 ते 42 दिवसात पाणी द्या. समजा पिकाला दोन पाणी देण्याइतके पाणी असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी द्यावे. पिकाला तीन पाणी देण्याइतके पाणी असल्यास तर त्यांनी पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी पेरणीनंतर 42 ते 45 दिवसांनी आणि तिसरे पाणी पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी द्यावे.
Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन