Onion Export Ban

Onion Export Ban । कांदा निर्यातबंदीचा शेतकऱ्यांना मोठा फटका! दरात झाली 50 टक्क्यांची घसरण, पाहा किती मिळतोय दर?

बाजारभाव

Onion Export Ban । कांदा (Onion) हे असे पीक आहे ज्याला भाव असो व नसो, शेतकरी मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड (Cultivation of Onion) करतात. अनेकदा बाजारभाव नसल्याने कांद्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येते. तर काहीवेळा शेतकऱ्यांना कांदा लखपती करतो. यंदा कांद्याचे दर (Onion Price) कमी झाल्याने कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे. त्यात सरकारने (Government) दरावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Subsidy for irrigation । शेतकऱ्यांनो, त्वरा करा; ठिबक आणि तुषार सिंचनासाठी मिळतंय अनुदान, सोप्या प्रकारे करा अर्ज

किरकोळ बाजारात कांद्याचे दर खूप कमी (Onion Price Falls Down) झाले आहेत. राज्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घाऊक दरात तब्बल 10 टक्क्यांची घसरण झाली आहे. पुढील काही दिवसात कांद्याच्या दरात (Onion Rate) आणखी घसरण होईल, असे व्यापाऱ्यांचे मत आहे. सोमवारी 2100 रुपये प्रति क्विंटलने विक्री होणाऱ्या कांद्याच्या दरात शुक्रवारी 1800 ते 1900 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरण झाली आहे.

Milk Rate । दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! अनुदानासाठी ‘या’ जिल्ह्याला दररोज मिळणार ११ लाख रुपये

50 टक्क्यांनी कमी झाले दर

जरी या दरांमुळे सर्वसामान्य जनतेला फायदा होत असला तरी शेतकऱ्यांना या खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे. निर्यातीवर बंदी घातल्यापासून कांद्याची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. 6 डिसेंबर रोजी कांद्याचा सरासरी घाऊक भाव प्रतिक्विंटल 3900 रुपये नोंदवला गेला असून मागील 15 दिवसांत कांद्याचे दर जवळपास 50 टक्क्यांनी कमी झाले आहेत.

How to get government land on rent । सरकारी जमीन भाड्याने कशी मिळवायची? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कांदा उत्पादक नाराज

वास्तविक, निर्यातबंदीमुळं कांद्याची आवक वाढली आहे. लासलगाव येथे खरिपाच्या ताज्या कांद्याची आवक प्रतिदिन 15 हजार क्विंटल झाली आहे. याच कारणावरून कांद्याच्या सरासरी घाऊक दरात कमालीची घट झाली आहे. लासलगावमध्ये (Lasalgaon agricultural produce market committee) कांद्याचे किमान घाऊक दर 800 रुपये प्रतिक्विंटल आणि कमाल 2100 रुपये प्रतिक्विंटल नोंदवण्यात आले आहेत. दर कमी झाल्याने कांदा उत्पादक नाराज झाले आहेत.

Business Idea । शेतीसोबत मोबाईल टॉवर लावा, लाखो रुपयांचा होईल नफा; जाणून घ्या कसं ते?

निर्यातबंदीमुळं कांद्याची येत्या काळातही आणखी घसरण होणार असल्याचे बोलले जात आहे. दर आणखी पडल्याने शेतकऱ्यांना आणखी तोटा सहन करावा लागणार आहे. जर असे झाले तर शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट आणखी कोलमडू शकते. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय तातडीने मागे घ्या, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Buffalo Worth Rs 10 Crore । रोज पाच किलो सफरचंद, राहण्यासाठी एसी रूम, महिन्याला ५० हजार खर्च; 10 कोटी रुपयांची म्हैस तुम्ही पाहिली का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *