Success Story

Success story । महिला शेतकऱ्याची कमालच न्यारी, जरबेरा फुलशेतीतून दररोज कमवतेय हजारो रुपये

बातम्या

Success story । पूर्वी शेतकरी फक्त पारंपारिक पद्धतीने शेती करत होते. परंतु आता त्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य दिले आहे. अनेक शेतकरी आज फुलशेती करून जास्त पैसे कमवत आहे. जर तुम्हालाही फुल शेती करायची असेल तर तुम्हाला बाजाराचाअभ्यास करावा लागेल. त्याशिवाय तुम्हाला योग्य ते नियोजन करावे लागेल. आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. असे एकही क्षेत्र नाही ज्यात महिलांची आघाडी नाही.

पॉलिहाऊसमध्ये केली जरबेरा फुलशेती

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील एका महिला शेतकर्याने आधुनिक पॉलिहाऊसमध्ये जरबेरा फुलाची यशस्वी शेती करून दाखवली आहे. स्वाती केंद्रे असे या यशस्वी शेतकरी महिलेचे नाव आहे. त्यांनी उच्च शिक्षण घेतले आहे. पूर्वी त्या आपल्या शेतात पारंपरिक पद्धतीने पिके घेत होत्या. परंतु त्यातून त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी फुल शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी फुल शेती करण्यासाठी जरबेरा या फुलाची निवड केली आहे.

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

यामध्ये त्यांचे पती ज्ञानेश्वर केंद्रे यांनी देखील त्यांना मोलाचे सहकार्य केले. त्यांचे पती पुणे जिल्ह्यातील जिल्हा सहकारी बँकेत कार्यरत आहेत. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी स्वाती यांनी सांभाळून यशस्वी शेती केली आहे. विशेष म्हणजे स्वाती केंद्रे यांनी अवघ्या 30 गुंठे जागेवर फुलशेतीसाठी पॉलिहाऊस उभारून त्यात लागवड केली आहे. लागवड करण्यापूर्वी त्यात त्यांनी लाल माती भाताची तूस आणि 25 ट्रॉली शेणखत टाकले आहे. यासाठी त्यांनी लागवडीसाठी त्यांनी राईस आणि शाईन जरबेरा या जातीची 18 हजार रोपे बेड पद्धतीने लावली.

Grapes Export । द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा! निर्यातीबाबत अजित पवारांनी दिले ‘हे’ आश्वासन

कमाई

या पद्धतीमध्ये त्यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला. त्यामुळे पाण्याची बचत झाली, जरबेरा शेतीतुन भरघोस उत्पन्न मिळाले घेतले असून यातून त्या लाखो रुपयांची कमाई करत आहेत. बाजारात सध्या जरबेरा या फुलाला चांगली मागणी आहे.

कारण सध्या लग्नसराई आणि उत्सवांचा काळ सुरू आहे. त्यामुळे बाजारात जरबेरा फुलाला चांगली मागणी आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे पीक वर्षभर येते. त्यामुळे यातून चांगली आर्थिक कमाई स्वाती केंद्रे करत आहेत. त्या जरबेरा पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवतात. त्यासाठी त्यांना 20 ते 90 रुपये प्रति गड्डी भाव मिळत आहे. दररोज त्यांच्या शेतातून मार्केटला तीनशे गड्डी पाठवण्यात येतात, यातून त्यांना दररोज हजारो रुपयांचे उत्पन्न मिळत आहेत.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *