Sugarcane cultivation

Sugarcane cultivation । नादच खुळा! ‘हे’ यंत्र करेल खोडवा उसाचे व्यवस्थापन; श्रम आणि मजुरांची मोठी बचत

तंत्रज्ञान

Sugarcane cultivation । राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड केली जाते. कारण ऊस हे पीक जास्त उत्पादन मिळवून देते. भरघोस उत्पादन मिळत असल्याने शेतकरी उसाची लागवड करतात, पण उसाची लागवड केल्यानंतर उसाची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही वेळेत ऊसाला खत पाणी दिले नाही तर साहजिकच उत्पादनात देखील घट होते. सध्या उसाच्या अनेक जाती आहेत, तुम्ही कोणतीही जास्त उत्पादन मिळवून देणारी जातीची निवड करून लागवड करू शकतात.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

बाजारात आले यंत्राचे आधुनिक वर्जन

उसाच्या सामान्य लागवडी पेक्षा उसाच्या खोडव्याकडे जास्त लक्ष देण्यात येते. उसाचा खोडव्यामुळे उत्पादनात अत्यंत घट देखील येते. यामुळे याबाबत दहिगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्याअभियांत्रिकी विभागाने ऊस खोडवा व्यवस्थापनाच्या यांत्रीकरणाबाबत जागृती केली आहे. या विभागाने स्थानिक कामगारांचे मदत घेऊन ट्रॅक्टर चलीत खोडवा व्यवस्थापन यंत्रात महत्त्वाच्या सुधारणा केल्या आहेत. याच माध्यमातून त्यांनी यंत्राचे आधुनिक वर्जन देखील तयार केले आहे.

Grapes Export । द्राक्ष उत्पादकांना मोठा दिलासा! निर्यातीबाबत अजित पवारांनी दिले ‘हे’ आश्वासन

पारंपारिक पद्धतीमध्ये ऊस खोडवा व्यवस्थापनास प्रति एकर 12 मजुरांची गरज असते. त्यासाठी प्रति मजूर तीनशे रुपये खर्च येतो म्हणजेच प्रतिएकर 3600 रुपये खर्च येतो. या यंत्राद्वारे एकरी दोन दिवसात हे काम होते. त्यामुळे डिझेल आणि एका व्यक्तीचा खर्च असा 1200 रुपये येतो. या यंत्रामुळे मजूर टंचाई आणि पैशांची बचत होते. शेतकऱ्यांनी जर या यंत्राचा वापर केला तर फुटाव्यांची संख्या वाढते. तसेच गरजेनुसार ऊसाला खताची मात्रा मिळाली तर फुटवे जास्त बळकट होतात आणि यातून शेतकऱ्यांना जास्त फायदा होतो.

Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या गाय दूध उत्पादकांना प्रतिलिटर ३८ रूपये दर जाहीर

जाणुन घ्या यंत्राचे वैशिष्ट्य

  • यंत्राचा विचार केला तर ट्रॅक्टरचलित यंत्र 1.17 मीटर रुंद, 1.40 मीटर उंच, तर 0.90 मीटर लांब आहे.
  • यंत्राचे पाते, गिअरबॉक्स, रिजरमध्ये बदल केले आहे.
  • बगला फोडणी व्यवस्थित करता करण्यासाठी यंत्राच्या फ्रेमच्या दोन्ही बाजूंना ‘रिजर’ बसवण्यात आले आहेत.
  • या यंत्राच्या मधोमध खालील भागात बुडखे छाटणीसाठी जमिनीलगत फिरणारे पाते बसवण्यात आले आहे.
  • पूर्वी पाते फिरण्याचा वेग 175 आरपीएम होता. आता गिअरबॉक्समध्ये बदल केल्याने तो 350 आरपीएम केला आहे.
  • ‘फ्रेम’ वर खत पेटी बसवली असल्याने बुडखे छाटणी, बगला फोडणी करतानाच खताचा बेसल डोस उसाच्या मुळांजवळ देणे अशी कामे एकाचवेळी करता येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *