Onion

Onion । ‘या’ तंत्रज्ञानामुळे साठवणूक केलेला कांदा कधीच सडणार नाही, कसे ते जाणून घ्या

बातम्या

Onion । राज्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion export ban) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची (Onion price) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. (Onion price falls)

TOP 5 Tractor Under 3 Lakh । हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त ट्रॅक्टर, मिळेल शक्तिशाली इंजिन आणि फीचर्स

कांदा हे नाशवंत पीक आहे. त्याची जास्त वेळ साठवून करता येत नाही. कांदा जास्त वेळ साठवून ठेवला तर तो कालांतराने सडू लागतो. शेतकऱ्यांना अशावेळी मोठा आर्थिक फटका बसतो. राज्यातील 25 ते 26 जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. खरीप आणि रब्बी हंगामात या पिकाची लागवड करण्यात येते. पण कांदा सडल्याने आर्थिक फटका बसतो.

Budget 2024 । कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

‘या’ तंत्रज्ञानाचा होणार वापर

मिळालेल्या माहितीनुसार आता कांदा साठवणुकीसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा खराब होण्याची आणि सडण्याची आकडेवारी मिळणार आहे. त्यामुळे खराब होत चाललेला कांदा चांगल्या कांद्यातून बाजूला ठेवता येईल. त्यामुळे अधिकचे होणारे नुकसान टाळता येईल.

Agriculture News । कामाची बातमी! 1 हेक्टर जमीन असल्यास तरीही शेतकऱ्यांना मिळणार 7 लाख रुपये, मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

यासाठी सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट राबवला जाईल. या अंतर्गत सुरुवातीला देशभरात एकूण 100 आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान आधारित कांदा साठवणूक केंद्राची उभारणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मग ही संख्या 500 पर्यंत पोहोचवण्याचा निर्धार असणार आहे. सरकारकडून यासाठी किती निधी उपलब्ध होईल याची माहिती समोर आली नाही.

Government Schemes । खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ठिबक- तुषार सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या योजना

शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

सरकारचा हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी झाला तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांचे होणारे करोडो रुपयांचे नुकसान यामुळे वाचणार आहे. शेतकऱ्यांचे हेच नुकसान कमी करण्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून एक मोठा निर्णय घेतला आहे. रब्बी हंगामातील 11,000 कोटी रुपयांचा कांदा दरवर्षी खराब होतो. सरकारच्या निर्णयामुळे हे प्रमाण कमी होईल.

Crop Damage Compensation । चिंताजनक बातमी! ‘या’ कारणामुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *