Budget 2024

Budget 2024 । कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, अर्थसंकल्पात सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

शासकीय योजना

Budget 2024 । शेतकऱ्यांना सतत कोणत्या ना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो. या समस्यांमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होते. अनेक शेतकरी आर्थिक संकट आल्याने टोकाचा निर्णय घेतात. यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होते. याच कारणामुळे केंद्र आणि राज्य सरकारने विविध योजनांना(Government schemes) सुरुवात केली आहे.

Government Schemes । खुशखबर! ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार ठिबक- तुषार सिंचनासाठी ५५ टक्के अनुदान, जाणून घ्या योजना

यापैकी एक योजना म्हणजे पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना (Pradhan Mantri Shektar Samman Yojana) होय. देशातील कोट्यवधी शेतकरी सरकारच्या या योजनेचा लाभ घेत आहेत. जर तुम्हीही या योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. (PM Kisan Yojana) राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचा टर्म २ चा हा शेवटचा अर्थसंकल्प असून निवडणूक वर्ष असल्याने हा अर्थसंकल्प अंतरिम अर्थसंकल्प असेल. (Agri schemes)

Crop Damage Compensation । चिंताजनक बातमी! ‘या’ कारणामुळे रखडली शेतकऱ्यांची नुकसानभरपाई

सरकारकडून मिळणार मोठे गिफ्ट

या अर्थसंकल्पात सरकारकडून शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. दहा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. दरम्यान, सरकार पीएम शेतकरी योजनेचा निधी प्रतिवर्षी सहा हजार रुपये देते. पण आता या निधीमध्ये वाढ होणार आहे. हा निधी सहा हजारांवरुन आठ हजार रुपये प्रतिवर्षी केला जाणार आहे.

Ujani Dam । बळीराजासाठी आनंदाची बातमी! उजनीतून शेतीसाठी साेडले पाणी

सरकार याबाबत लवकरच घोषणा करणारा आहे. फेब्रुवारी 2024 ते मार्च 2024 दरम्यान पीएम शेतकरी योजनेचा १६ वा हप्ता वर्ग होण्याची शक्यता आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 15 नोव्हेंबर 2023 रोजी शेतकरी सन्मान योजनेचा 15 वा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे या योजनेचे पात्र शेतकरी पुढील हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Milk Subsidy । दूध उत्पादकांना मोठा धक्का! दुधात पुन्हा ५ ते ६ रुपयांची घसरण

अशी तपासा लाभार्थी यादी

  • PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmkisan.gov.in/ वर जा.
  • तुम्हाला उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नरचा पर्याय दिसेल.
  • या ठिकाणी Beneficiary Status या पर्यायावर क्लिक करा. पुढे एक नवीन पेज उघडेल.
  • पुढे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यांपैकी पर्याय निवडा.
  • या तीन क्रमांकांद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही ते पाहू शकता.
  • तुम्ही निवडलेल्या पर्यायाचा नंबर प्रविष्ट करून Get Data वर क्लिक करा.
  • क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्व व्यवहारांची माहिती येईल.
  • तुम्हाला FTO जनरेट झाले आहे आणि पेमेंट कन्फर्मेशन पेंडिंग लिहिलेले दिसत असल्यास तर याचा अर्थ तुमच्या रकमेवर प्रक्रिया होत आहे, हे लक्षात ठेवा.

Onion Powder Project in Nashik । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाशिकमध्ये कांदा भुकटी प्रकल्प सुरू होणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *