Milk Subsidy । अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन (Animal husbandry) हा व्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो. परंतु, यंदा हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण यंदा दुधाचे दर (Milk price) कमालीचे घसरले आहेत. पशुपालकांना दिलासा देण्यासाठी मागील आठवड्यात पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.
पशुपालकांना मोठा फटका
अशातच आता पशुपालकांना धक्का देणारी बातमी आहे. दुधाचे दर पुन्हा एकदा प्रतिलिटर ५ ते ६ रुपयांची घसरण (Milk price falls) झाली आहे. इतकेच नाही तर आता पशुखाद्याच्या दरात ५० किलो पोत्याला १०० ते १५० रुपये वाढले आहेत. शिवाय पावसाअभावी पिके जळून गेली आहेत. पिके जळाल्याने चारा खूप महाग झाला आहे. त्यामुळे पशुपालकांना आर्थिक फटका बसत आहे.
Agriculture News । ‘हा’ AI चॅटबॉट शेतकऱ्यांचा सोबती, प्रत्येक प्रश्नाचे एका झटक्यात मिळणार उत्तर
पशुखाद्य महागले
दरम्यान, जानेवारी २०२३ मध्ये गोळी पेंडीचा दर ५० किलोच्या पोत्यास १,५५० रुपये दर होता. यात १५० रुपयांची वाढ होऊन प्रति पोते १,७०० रुपये दर झाला आहे. शहराजवळील मोठे दुग्ध व्यावसायिक, दूध डेअरी चालकांना १,६२० रुपयांना पेंडीचे पोते खरेदी करावे लागत आहे. शेंग पेंडीला जानेवारी, २०२३ मध्ये प्रति पोते २,८०० ते २,९०० रुपयांना शेतकऱ्यांना मिळत होते. पण सध्या पोत्याचा ४०० ते ३०० रुपये दर वाढला आहे. (Animal feed expensive)
कृषी, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास विभागाकडून जीआर जारी करण्यात आला आहे. राज्य दूध उत्पादक संघांनी शेतकऱ्यांच्या 3.5 फॅट आणि 8.5 एसएनएफ गुणवत्तेच्या गाईच्या दुधाला 27 रुपये प्रति लिटर दर देणे असेल. दूध उत्पादक शेतकऱ्यांना घोषित सरकारी अनुदान 11 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीसाठी मिळेल, असे या जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, 1 जानेवारी 2024 पासून पुढील दोन महिन्यासाठी दूध अनुदान दिले जाईल, अशी घोषणा मंत्री विखे पाटील यांनी केली होती. असे असूनही आता जीआरमध्ये दूध अनुदानासाठीच्या कालावधीमध्ये घट केली आहे. सरकारकडून पुढील निर्णयानंतर हा कालावधी वाढवण्याची शक्यता आहे. जरी अनुदान जाहीर केले असले तरी दुधाचे दर कमी झाल्याने पशुपालकांना मोठा फटका बसत आहे.
Onion Export । मोठी बातमी! भारताकडे इंडोनेशियाने केली 900,000 टन कांदा निर्यात करण्याची मागणी