Animal Husbandry

Animal Husbandry । जनावरातील दूध उत्पादनात घट येण्याची ‘ही’ आहेत प्रमुख कारणे; पशुपालकांनो वाचा तुमच्या फायद्याची माहिती

पशुसंवर्धन

Animal Husbandry । आपल्याकडे बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन हा व्यवसाय करतात. यामधून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागतो म्हणून अनेक शेतकऱ्यांचा कल हा पशुपालनाकडे वळला आहे. मात्र बऱ्याचदा पशूंच्या दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात घाट होते. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे आज आपण पशूच्या दूध उत्पादनात घट होण्याची नेमकी कोणती कारणे आहेत ते पाहणार आहोत.

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! या भागांमध्ये पुढील ३ दिवस पाऊस पडण्याची शक्यता, वाचा हवामान विभागाचा महत्वाचा अंदाज

१) असंतुलित आहार : (Unbalanced diet)

असंतुलित व अपुऱ्या आहारामुळे तसेच अपुऱ्या पिण्याच्या पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी शरीराची वाढ न होणे, शरीराची झीज भरुन न येणे, वेळेवर गाभण न राहणे इत्यादी वाईट परिणाम तथा दूध उत्पादनात घट येणे किंवा दुधाची पातळी टिकून न राहणे असे होते. जरुरीपेक्षा जास्त आहार दिल्याने फायदा होतोच असे नाही.

Agriculture Land । शेत जमीन विकल्यास कर भरावा लागतो का? कायदा काय सांगतो जाणून घ्या

२) दगडीकास / स्तनदाह :

सुप्त स्तनदाहामुळे, जो दूध उत्पादकाच्या लक्षातही येत नाही. दूध उत्पादनात १०% ते१५% घट येते, तर दृष्य स्तनदाहात हेच घटीचे प्रमाण २०% ते २५% असते. स्तनदाहाच्या एका बाधित सडापासून दुसऱ्या सडांना व दुसऱ्या गायींनाही संसर्ग होण्याची भिती असते. सड कायमस्वरुपी बंद होऊ शकतो. याकरिता स्तनदाह प्रतिबंधक काळजी घेणे आवश्यक आहे.

Agriculture News । ‘शेतकऱ्यांनो’ धान्याला किडीपासून वाचविणे झाले सोपे; बाजारात आली नवीन प्लास्टिक बॅग; पाहा Video

३) गोठ्यातील वातावरण : (Barn environment)

गोठयातील वातावरण सुखकारक व आरामदायी नसल्यास, यामध्ये तापमान, वायुविजन, गव्हाणीची व बांधण्याची जागा, त्यावरील ढाळ, स्वच्छ पाण्याची चोवीस तास उपलब्धता व मलमुत्राचा निचरा इत्यादी गोष्टींचा समावेश होतो, दूध उत्पादनात १०% पर्यंत घट होऊ शकते.

Weather Update । सावधान! या ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता; आयएमडीने जारी केला अलर्ट

४) लसीकरण : (Vaccination)

जनावरांना विविध ऋतुमानांप्रमाणे विविध प्रकारचे संसर्गजन्य रोग होतात. उदा : लाळ्या खुरकुत, फन्या, घटसर्प, थायलेरियसिस. या रोगामुळे औषधपाण्याचा व डॉक्टरचा खर्च येतोच, वर दूध उत्पादनात घट येते. याकरीता हे रोग आपल्या जनावरांना होऊ नयेत, म्हणून विविध संसर्गजन्य रोगांविरूद्ध लसीकरणाची वाट पाहू नये, अन्यथा कित्येक वेळी उशीर होऊन रोग आधी व लस नंतर पोहचते. वरील कारणामुळे दूध उत्पादनात घट होण्याची शक्यता असते.

Onion Rate । आज कांद्याला किती बाजार मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *