Success story । सध्याच्या काळात काही तरुण शेतकरी शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. विशेष म्हणजे ते पारंपारिक पद्धतीनं शेती न करता आधुनिक पध्दतीनं शेती करत आहेत. त्यापैकी काही उच्चशिक्षीत तरुण नोकरी न करता यशस्वी शेती करत आहेत.परंतु, त्यासाठी मेहनत खूप महत्त्वाची आहे. तुम्ही मेहनत घेतली तरच तुम्हाला त्याचा फायदा होईल.
Havaman Andaj । येत्या दोन दिवसात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार परतीचा पाऊस, जाणून घ्या IMD अलर्ट
हे निमगाव केतकीतील एका शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. या शेतकऱ्याचे नाव पोपट घुसाळकर असे आहे. घुसाळकर यांना एकूण ११ एकर शेती आहे. त्यामध्ये त्यांनी पाच एकर पेरू, (Taiwan Pink Guava) चार एकर डाळिंब आणि एक एकर शेततळे आहे. महत्त्वाचे म्हणजे त्यांचे भांड्याचे दुकान आहे. परंतु, त्यांनी व्यवसाय न करता शेतीतून काहीतरी नावीन्यपूर्ण उत्पादन घेण्याचे ठरवले.
Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी
पेरू लागवडीसाठी पोपट घुसाळकर यांना त्यांच्या पत्नी सुरेखा, मुले दीपक आणि संदीप यांनी खूप मदत केली. त्यांनी जानेवारी २०१२ मध्ये तैवान पिंक जातीची ३ हजार पेरूची रोपे १२ रुपये दराने (Taiwan Pink Guava Cultivation) आणली. त्याच्या रोपांची रोपे ३ एकरमध्ये लागवड केली. त्यांना निमगाव केतकीतील प्रसिद्ध फळ बागायतदार मच्छिंद्र भोंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे त्यांना खूप मोठा फायदा झाला.
Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता
खर्च आणि उत्पन्न
पोपट घुसाळकर यांना एकरी अडीच लाख याप्रमाणे तीन एकरासाठी साडेसात लाख रुपयांचा खर्च आला. पहिल्या पिकातच साठ टन पेरूचे उत्पादन निघाले आहे. विशेष म्हणजे त्यांना शेतातच एक्कावन रुपये या प्रमाणे दर मिळाला आहे. यातून त्यांना तीस लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा आणखी १५ टन माल शिल्लक आहे. त्याला पंच्याहत्तर रुपये दर मिळेल. त्यामुळे त्यांना आणखी ११ ते १२ लाख रुपये उत्पादन मिळेल.
Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या