Success story

Success story । MBA चायवाला नंतर MBA कोंबडीवाल्याची चर्चा! महिन्याला करतोय लाखोंची उलाढाल

यशोगाथा

Success story । अलीकडच्या काळात नोकरीपेक्षा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उच्च शिक्षित तरुणाई लाखो रुपयांच्या नोकरीवर लाथ मारून व्यवसायात उतरू लागले आहेत. जर योग्य नियोजन आणि मेहनत घेतली तर कोणत्याही व्यवसायातून जास्त पैसे कमावता येतात. तुम्ही MBA चायवाल्याचे (MBA Chaiwala) नाव ऐकले असेल.

Animal husbandry । आलिशान कारपेक्षा महाग म्हैस! किंमत जाणून व्हाल थक्क

परंतु तुम्ही कोंबडीवाल्याचे नाव ऐकले आहे का? गया जिल्ह्यातील परैया बाजार येथील रहिवासी असणाऱ्या कुमार गौतम या युवकाने बनारस हिंदू विद्यापीठातून एमबीएमध्ये पदव्युत्तर पदवीधर घेतली आहे. ते नोकरी करत घराजवळ कडकनाथ कोंबडी (Kadkanath Chicken) आणि लहान पक्षांचे पालन करत आहेत. यातून त्यांना वर्षाला लाखोंचा नफा मिळत आहे. (Poultry Farmer)

Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ

असा असतो रोजचा दिनक्रम

कुमार गौतम रोज सकाळी उठून कडकनाथ कोंबडी आणि लहान पक्षांना खायला देतात. त्यानंतर ते गुरुरू ब्लॉकच्या महमदपूर मिडल स्कूलमध्ये सरकारी शाळेतील मुलांना शिकवण्यासाठी जातात. शाळेतून परत आल्यानंतर पुन्हा ते कडकनाथ कोंबडी आणि लहान पक्षांची काळजी घेतात.

Milk Rate । शेतकऱ्यांना पुन्हा धक्का! खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतकी’ कपात

कडकनाथ कोंबडीला मिळाले जीआय टॅगिंग

याबाबत कुमार गौतम असे सांगतात की, ज्यावेळी कडकनाथ कोंबडीला जीआय टॅगिंग मिळाले आणि भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीनेही त्यांना फॉलो करायला सुरुवात केली त्यावेळी लोकांमध्ये ही कोंबडी पाळण्याचा ट्रेंड वाढला. या कोंबडीची किंमत 800 रुपये किलो आहे. तर गयामध्ये हीच किंमत 1000 रुपयांवर पोहोचली आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता सारख्या मोठ्या शहरांमध्ये चिकनचा दर 1800 रुपयांवर गेला आहे.

Sim Card । सावधान! तुमच्या नावावर किती सिमकार्ड आहेत? ‘या’ पद्धतीने जाणून घ्या नाहीतर..

मध्य प्रदेशातून मागवली पिल्ले

कुमार गौतम यांनी मध्य प्रदेशातून कडकनाथ कोंबडीची पिल्ले आणली असून कोंबडा 35 ते 40 दिवसात प्रौढ होतो. तो बाजारात चांगल्या दराने विकला जातो. तसेच लहान पक्षीही तयार करून विकली जातात. एका लहान पक्षाची किंमत 40 ते 45 रुपये इतकी आहे. तर 45 दिवसांनंतर त्याची विक्री केली जाते.

PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ

मिळतो चांगला नफा

खरंतर 1995 हे वर्ष गया जिल्ह्यातील परैया ब्लॉकमध्ये नक्षल दहशतीच्या छायेत होते. भीतीमुळे अनेकजण गाव सोडून गेले. उरलेल्या लोकांनी शेती शिवाय कोणताही व्यवसाय केला नाही. 1997 नंतर परिस्थिती बदलली. येथील लोक विविध प्रकारचे व्यवसाय करू लागले. विशेष म्हणजे त्यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *