Property Law । कोणत्याही विवाहित स्त्रीला तिचा पती जिवंत असेपर्यंत पतीच्या कोणत्याही मालमत्तेवर कोणताही अधिकार नसतो. परंतु तिच्या पतीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने संपत्ती दुसऱ्या व्यक्तीला मृत्युपत्रात दिली, तर त्या मृत्युपत्राच्या वारसाला मालमत्तेत हक्क असतो शिवाय पत्नीला मालमत्तेत कोणताही अधिकार नसतो, असा पूर्वी नियम होता, परंतु आता स्त्रियांना संपत्तीत समान अधिकार मिळत आहे.
फक्त पूर्वी नाही तर आताही संपत्तीवरून खूप वाद होतात. त्यासाठी कायदेही खूप कडक करण्यात आले आहेत. स्त्रियांना आता संपत्तीतही समान हक्क आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर मुलीचा त्यांच्या संपत्तीवर आणि सासरी नवऱ्याच्या पश्चात संपत्तीवर सुनेचा हक्क असतो. स्वतः मिळवलेली मालमत्ता आणि वारसाहक्काने मिळालेली मालमत्ता असे मालमत्तेचे दोन प्रकार आहेत.
संपत्तीत मुलीचा हक्क
मुलीचा आपल्या आईवडिलांच्या संपत्तीवर समान हक्क असतो. समजा मुलगी विवाहित असली किंवा विधवा असली तरी तिला तिच्या आई वडिलांच्या घरी राहण्याचा हक्क असतो. परंतु, हे लक्षात घ्या की जर वडिलांनी वारसपत्रात त्या मुलीचे नाव लिहिले नसेल तर तिला संपत्तीत कोणताही अधिकार मिळत नाही.
संपत्तीत सुनेचा हक्क
सासरकडील संपत्तीत सुनेचा कोणताही अधिकार नसतो. परंतु, आपल्या नवऱ्याच्या संपत्तीवर अधिकार मिळवण्यासाठी सुनेला दावा करता येतो. दरम्यान सासू सासऱ्यांच्या वारसपत्रात कुणाचेच नाव नसल्यास, मुलाचा मृत्यु झाल्यास नियमानुसार ती संपत्ती सुनेच्या नावावर होते.
दरम्यान, अनेक महिलांना त्यांना आपल्यालाही संपत्तीत समान अधिकार आहेत हे माहिती नसते त्यामुळे त्याचा त्यांना लाभ घेत येत नाही. बऱ्याचवेळा त्यांची सासरच्या मंडळींकडून किंवा माहेरच्या मंडळींकडून फसवणूक होते. परंतु जर तुम्हाला हिन्दू उत्तराधिकार अधिनियम २००५ माहिती असेल तर तुमची फसवणूक होणार नाही. तुम्हाला न्यायालयातही दाद मागता येईल.