Animal Husbandry | शेती व्यवसाय करत असतानाच पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेतकरी पशुपालन (Animal Husbandry) करतात. यामधून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. परंतु, पशुपालन करत असताना शेतकऱ्यांना अनेक अडचणींना देखील सामोरे जावे लागते. त्यातील सर्वात मोठी आणि मुख्य अडचण म्हणजे गायी आणि म्हशींचे दूध कमी येणे. यामुळे दुग्धउत्पादनात (Milk Production) घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो.
Havaman Andaj । पुढील ५ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट
दरम्यान जनावरांमध्ये होणारी दुधाची घट टाळण्यासाठी काही नैसर्गिक उपाय करता येतात. बऱ्याचदा शेतकरी दुधाचे उत्पादन वाढावे यासाठी जनावरांना इंजेक्शन किंवा इतर औषधे दिली जातात. यामुळे जनावरांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि हे दूध सेवन करणे सुद्धा धोकादायक ठरू शकते. त्यामुळे जनावरांच्या दूध वाढीसाठी नैसर्गिक उपाय करणे आवश्यक आहे.
Lemongrass tea | खर्च कमी पण उत्पन्न जास्त! लाखो रुपयांचे उत्पन्न देणारे ‘हे’ पीक घेऊन बघाच
Natural Tips For Milk Production | दुग्धोत्पादन वाढीसाठी नैसर्गिक उपाय
- दलिया, मेथी आणि गुळ व्यवस्थित शिजवून घ्यावा आणि त्यामध्ये नारळाचे खोबरे बारीक करून टाकावे.
जनावर व्यायल्याच्या आधी एक महिना आणि जनावर व्यायल्यानंतर दोन महिने रोज सकाळी हे मिश्रण गाईला खाऊ घालावे. वासरू 21 दिवसांचे होईपर्यंत हा आहार द्यावा. त्यानंतर वासरू तीन महिन्यांचे झाले किंवा आईचे दूध कमी आले की दररोज 30 ग्रॅम जवसाचे औषध पाजावे. यामुळे दूध कमी होणार नाही.
Onion Rates | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांदा ‘शंभरी’ गाठणार
- जनावरांचे दुधाचे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांना संतुलित आहार द्यावा. यामध्ये चाऱ्यातील मका, बार्ली, गहू, बाजरी हे पूर्वीच्या तुलनेत जास्त द्यावे. तसेच केकमध्ये मस्टर्ड केक, शेंगदाणा केक, कापूस पेंड, जवसाचे पेंड द्यावे.
Vintage Car | पुण्यातील शेतकऱ्याने केली कमाल! चक्क भंगारापासून बनवली विंटेज कार
- मोहरीचे तेल आणि धान्याच्या पिठापासून बनवलेले औषध सुद्धा दुधाच्या उत्पादन वाढीसाठी मदत करते. 200 ते 300 ग्रॅम मोहरीच्या तेलात 250 ग्रॅम गव्हाचे पीठ घेऊन संध्याकाळच्या वेळेस जनावरांना चाऱ्यासोबत खायला द्यावे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे औषध दिल्यानंतर जनावरांना पाणी प्यायला देऊ नये. यामुळे खोकल्याची समस्या निर्माण होऊ शकते. फक्त सात ते आठ दिवसाच हे औषध द्यावे.
Rabbi Crops | अशाप्रकारे मेथीची लागवड करा आणि मिळवा दुप्पट नफा!