Milk rate । सध्या पशुपालनाचा व्यवसाय धोक्यात आला आहे. कारण दुधाचे दर कमालीचे घसरले आहेत. शिवाय पावसाअभावी चारा महाग झाला आहे. कमी झालेले दुधाचे दर आणि चारा महाग झाल्याने दूध उत्पादक मेटाकुटीला आला आहे. अशातच दूध उत्पादकांना प्रतिलीटर ५ रुपये अनुदान द्यावे अशी मागणी केली जात होती. परंतु आता हे अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळणार नाही.
दूध उत्पादकांना फटका
वास्तविक जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात हे अनुदान दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. परंतु याचा सर्वांना फायदा होणार नाही. राधाकृष्ण विखे आणि बाळसाहेब थोरात या अहमदनगरच्या (Ahmdnagar) दोन दिग्गज नेत्यांच्या कुरघोडीच्या नेत्यांमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फटका बसल्याचे बोलले जात आहे. विखे पाटील यांच्याकडे पशुसंवर्धन मंत्रीपद आल्यापासून दुधाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
Cotton Rate । शेतकऱ्यांनी कापूस बाजारात आणण्याऐवजी साठवण करून ठेवला; समोर आलं मोठं कारण
थोरातांचा राजहंस दूध सहकारी संघावर वरचश्मा असून राधाकृष्ण विखेंचा अहमदनगर जिल्ह्यात साखर सहकारात खूप दरारा आहे. त्यामुळे या दोघाजणांची जिल्ह्याच्या राजकारणाचं रिमोट कंट्रोल स्वत:कडे ठेवण्यासाठी धडपड सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात थोरातांना दाबण्यासाठी विखेंनी सहकारी दूध संघाच्या दुधावर ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली गेली. पण हा निर्णय केवळ सहकारी दूध संघांसाठी असणार आहे.
Onion Rate । शेतकरी मोठ्या चिंतेत, कांद्याचे भाव अजून घसरणार; आवक वाढल्याने दर घसरण्याची शक्यता
कोणाला होणार फायदा ?
दरम्यान, सहकारी दूध संघाने २९ रुपये दूध दर दिले तर राज्य सरकार ५ रुपये अनुदान शेतकऱ्यांना देईल. परंतु, दूध संघाने २९ रुपये दर दिला नाही तर? मग शेतकऱ्यांना राज्य सरकार अनुदान मिळणार नाही. दूध खाजगी कंपन्यांकडे ७२ ते ७५ टक्के जाते. तसे पाहिले तर सहकारी दूध संघाला दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांपेक्षा खाजगी दूध संघाला दूध घालणाऱ्या उत्पादकांची संख्या खूप आहे.
जे दूध उत्पादक सहकारी दूध संघाला दूध घालतात त्यांनाच याचा फायदा होणार आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट पडल्यानंतर शरद पवार गटाच्या सहकारी दूध संघांना धडा शिकवण्यासाठी असे निर्णय घेतले जात आहे, असे बोललं जातं आहे. परंतु, या वादामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान होत आहे.