Document registration

Document registration । बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! आता अदृश्य होणार आधार, पॅन, बोटांचे ठसे

शेती कायदे

Document registration । आज मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी (Property purchase), भाडेकरार, साठेखत केले जात आहे. यासाठी दस्त नोंदणीमध्ये खरेदीदार आणि विक्री करणाऱ्याचे आधार व पॅन क्रमांक (Aadhaar and PAN number) तसेच बोटांचे ठसे घेण्यात येतात. धक्कादायक बाब म्हणजे आधार, पॅन (PAN Card) आणि बोटांच्या ठशांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल तसेच बिहार या राज्यांमध्ये बनावट दस्त नोंदणी (Registration of forged documents) केली जात होती.

Garlic Price । लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लसूण दरात झाली मोठी वाढ; पाहा किती मिळतोय दर?

बनावट दस्त नोंदणीला बसणार आळा

यामुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसत होता. यावर आता केंद्र सरकारने (Central Govt) मोठे पाऊल उचलले आहे. केंद्राने आता बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी सर्व राज्यांच्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला तातडीचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून गैरवापर टाळण्यासाठी ऑनलाईन दस्त (Online registration) डाऊनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे दिसणार नाहीत अशा स्वरूपाची सुविधा तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Ravikant Tupkar । शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

दरम्यान, राज्यात आतापर्यंत सुमारे चार कोटी दस्त नोंदणीकृत झाले असून केंद्र सरकारने सुचविलेले हे सर्व बदल चार कोटी दस्तांमध्ये करणे शक्य नाही. त्यामुळे आता त्यावर तोडगा म्हणून दिल्ली येथील राष्ट्रीय माहिती केंद्राने दस्त ऑनलाईन डाउनलोड करताना आधार, पॅन व बोटांचे ठसे मास्क्ड होणार आहेत. म्हणजेच ते दिसणार नाहीत. येत्या महिनाभरात ही सुविधा राज्यात लागू होणार आहे.

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

“जून-२०२३ पासून राज्यात दस्त तयार करताना बोटांचे ठसे घेतले जातात. पण त्याची प्रत्यक्ष प्रत काढल्यानंतर त्यावर केवळ ‘बरोबर’ची खूण दिसून येते. बोटांचे ठसे हे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या डेटामध्ये जतन केले जातात. त्यानुसार आता आधार आणि पॅन क्रमांक मास्क्ड होतील. त्यामुळे सायबर गुन्हेगारांना बनावट दस्त नोंदणी करता येणार नाही,” अशी माहिती पुण्याचे नोंदणी उपमहानिरीक्षक अभिषेक देशमुख यांनी दिली आहे.

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *