Bhandara News । शेतकऱ्यांना शेतात कष्ट करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या सर्व अडचणींवर मात देऊन शेतकरी आपले पीक फुलवत असतात. मात्र बऱ्याचदा जंगली प्राणी, मधमाशा किंवा इतर काही प्राण्यांचे हल्ले हे शेतकऱ्यांवर होतच असतात. शेतकऱ्यांना याची भीती देखील मोठ्या प्रमाणात असते. मात्र तरी देखील शेतकरी दिवस रात्र शेतात कष्ट करतात आणि आपले पीक फुलवतात. दरम्यान सध्या भंडारा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भंडारा जिल्ह्यामध्ये शेतात काम करण्यासाठी गेलेल्या काही मजूर महिलांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यामध्ये तीन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भंडारा जिल्ह्यातील भागडी परिसरामध्ये ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, तीन महिला हरभरा पिकातील तण काढण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या महिलांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये तिनही महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. मधमाशांनी अचानक हल्ला केल्यानंतर बचावासाठी महिलांनी शेतातून पळ काढला मात्र तरी देखील यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या आहेत.
तेथील शेजारच्या शेतात देखील मजूर काम करत होते. यावेळी त्यांना या घटनेची माहिती मिळाली त्यानंतर मजुरांनी या महिलांच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली आणि जखमी महिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Agriculture Land । शेत जमीन विकल्यास कर भरावा लागतो का? कायदा काय सांगतो जाणून घ्या