Most Expensive Potato । अनेकांना बटाट्याची (Potato) भाजी खूप आवडते. त्यामुळे काही स्वयंपाकघरात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. बाजारात बटाट्याची जास्त मागणी असते. मागणी जास्त असल्याने शेतकरीही मोठ्या प्रमाणावर बटाट्याची लागवड (Cultivation of potato) करतात. बटाट्याचे विविध प्रकार (Potato Type) आहेत. एका जातीचे बटाटे सर्वात जास्त किमतीने (Potato price) विकले जाते.
ले बोनोटे
सोने-चांदीपेक्षाही या बटाट्याची किंमत जास्त आहे. किमतीचा विचार केला तर हे बटाटे प्रति किलो 90 हजार रुपये दराने विकले जात आहे. बटाट्याच्या या जातीचे नाव ‘ले बोनोटे’ (Le Bonotte) असे आहे. याचे उत्पादन भारतात नाही तर फ्रान्समध्ये घेतले जाते. विशेष म्हणजे हे बटाटे जरी महाग (Le Bonotte Price) असले तरी त्याची खरेदी करण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळते. (Le Bonnotte world most expensive potato)
त्यात लिंबासोबत मीठ आणि अक्रोडाची चव असते. हे बटाटे मऊ आणि नाजूक असते. जे सर्वसाधारण बटाट्यापेक्षा वेगळे असते. सध्या बटाट्याच्या किमतीचा विचार करायचा झाला तर त्याची किंमत 20 ते 25 रुपये प्रतिकिलो असते. परंतु, हे बटाटे 90000 रुपये किलो दराने विकले जाते. मे ते जून या कालावधीत त्याचे उत्पादन (Le Bonotte Cultivation) घेतले जाते.
Onion Rate । हृदयद्रावक! कांद्याला चक्क १ रुपये दर, शेतकऱ्यासमोर मोठे आर्थिक संकट
अशी केली जाते लागवड
या जातीच्या बटाट्याची लागवड 50 चौरस मीटर वालुकामय जमिनीवर करतात. याच्या वाढीसाठी सीव्हीड खताचा वापर केला जातो. पारंपारिक पद्धतीने अटलांटिक महासागरातील लोअर प्रदेशाच्या किनार्यावरील नोइमॉर्टियर या बेटावर याची लागवड करण्यात येते. लागवडीनंतर 2500 लोक बटाटे उचलण्यासाठी सात दिवस काम करतात. महत्त्वाचे म्हणजे 10,000 टन बटाट्याच्या पिकांपैकी केवळ 100 टन ले बोनोटे बटाट्याचे उत्पन्न होते.
एक किलो ले बोनोटे या बटाट्याची किंमत इतकी आहे की एवढ्या पैशात एका मध्यमवर्गीय कुटुंबाला वर्षभराचा रेशन सहज मिळेल. जरी या बटाट्याची किंमत वाढली तरी लोक ते विकत घेऊन खायला तयार असतात. उपलब्धतेनुसार या बटाट्याची किंमत बदलत असते. परंतु आतापर्यंत ते 50,000 ते 90,000 रुपये प्रति किलो दराने विकले आहे.
Bhandara News । धक्कादायक बातमी! शेतात तीन महिलांवर मधमाशांचा भयानक हल्ला, तिघीही गंभीर जखमी