Milk Business

Milk Business । तुम्हालाही मिळवायचा असेल दूध व्यवसायात नफा तर खरेदी करा ‘या’ मशिन्स, वाचा सविस्तर माहिती

पशुसंवर्धन

Milk Business । अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal husbandry) केले जात आहे. शेतीसोबत केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होत आहे. समजा तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry business) जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध (Milk) देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. याशिवाय त्यांच्या आहाराची आणि आरोग्याची जास्त काळजी घ्यावी लागते. तर हा व्यवसाय करणे फायदेशीर आहे.

मुलाला शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको ग बाई, वावरातल्या कारभाऱ्याला मिळेना कारभारीण

सध्या हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण दुधाचे दर (Milk Price) कमी झाले आहेत. शिवाय पावसाविना चाऱ्याच्या किमतीत गगनाला भिडल्या आहेत. दूध उत्पादनाचा विचार करायचा झाला तर भारत (India) हा पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ राजस्थान आणि उत्तर प्रदेश ही राज्ये आहेत. या राज्यात प्रत्येक वर्षी सरासरी 1.5 कोटी टन दुधाचे उत्पादन (Milk production) होते.

Ambedkar death anniversary । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शेतीविषयक विचार आजही ठरतात मार्गदर्शक; कोणते ते जाणून घ्या?

अलीकडच्या काळात दूध काढण्यापासून ते पॅकिंग करुन बाजारात पुरवठा करण्यापर्यंत अनेक यंत्रे वापरण्यात येत आहेत. अनेकजण डेअरी उद्योगात व्यवसाय करतात. जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर तुम्हीदेखील या मशिन्स (Milk machines) खरेदी करून व्यवसाय करू शकता. तुम्हाला दूध संकलन केंद्र चालू करता येईल. विशेष म्हणजे कमी खर्चात तुम्ही व्यवसाय करू शकता. त्यासाठी काही मशिन्स गरजेच्या आहेत.

Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर

  • मिल्क कूलर मशीन

या मशीनचा वापर दूध थंड करण्यासाठी तसेच साठवण्यासाठी करण्यात येतो. यामुळे दुधाचा ताजेपणा टिकवून ठेवण्यास आणि शेल्फ लाइफ वाढवण्यात मदतहोते. 250 लिटर ते 10 हजार लिटर दूध थंड करण्याची क्षमता असणारे मशीन खरेदी केल्यास तुम्हाला 70 ते 80 हजार रुपये खर्च करावे लागू शकतात. (Milk cooler machine)

Agriculture electricity । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेतीसाठी दिवसा मिळणार 12 तास वीज, फडणवीसांनी दिलं आश्वासन

  • बॉटलिंग मशीन

दुधाच्या किरकोळ वितरणासाठी दुधाच्या बाटल्या पॅकेजिंग आणि सील करण्यासाठी बाटलीबंद मशीन (Bottling machine) गरजेचे आहे. तुम्हाला बाजारात अनेक ब्रँडचे दूध पाहायला मिळत असेल. त्यातील काही या मशीनद्वारे तयार केले जाते. या मशीनची किंमत सुमारे 1 ते 2 लाख रुपये इतकी आहे.

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

  • दही तयार करण्याचे यंत्र

अलीकडच्या काळात दुधापासून बनवलेल्या पदार्थांनादेखील चांगली मागणी आहे. यात दह्याची मागणी जास्त आहे. तुम्ही दही बनवण्याचे मशीन खरेदी केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल. या मशीनची किंमत आकार आणि क्षमतेनुसार वेगळी आहे. लहान मशीन 30 हजार ते 1 लाख रुपयांच्या दरम्यान उपलब्ध आहे.

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

  • दूध प्रक्रिया यंत्र

या मशीनच्या मदतीने दूध, चीज, तूप, मलई उत्पादने तयार केली जातात. समजा तुमचे बजेट लाखात नसेल तर तुम्ही लहान मशीन घेऊ शकता. प्रति तास 80 लिटर दुधावर प्रक्रिया करण्याची क्षमता असणारे छोटे मशीन खरेदी केल्यास तुम्हाला 40-50 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. (Milk processing machine)

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *