देशात मोठ्या प्रमाणावर शेती (Agriculture) केली जाते. अलीकडच्या काळात शेतकरी पिके पारंपारिक पद्धतीने न घेता आधुनिक पद्धतीने पिके घेत आहेत. विशेष म्हणजे आधुनिक पिकांमुळे भरघोस उत्पन्न मिळते, त्यामुळे आता उच्च शिक्षित तरुण (Young Farmers) देखील लाखो रुपये पगार असणाऱ्या नोकरीला लाथ मारून शेती करत आहेत. परंतु, आता या शेतकरी (Farmers) तरुणांना आता वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शेतकरी तरुणांना लग्नासाठी मुलगी मिळेनाशी झाली आहे. (Farmers Crisis) मुलीदेखील उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे त्यांना मुलगा सुशिक्षित, चांगल्या कंपनीत आणि महत्त्वाचे म्हणजे गलेगठ्ठ पगार देखील त्या मुलाला असावा. विशेष म्हणजे त्याला शेती देखील असावी, पण त्याने शेती न करता नोकरी करावी, अशी मागणी मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. यामुळे या तरुणांवर मोठं संकट आलं आहे.
Farmers Suicide । आत्महत्येबाबत महाराष्ट्र अग्रेसर; धक्कादायक आकडेवारी आली समोर
शेती पाहिजे पण शेतकरी नवरा नको
साहजिकच आता लग्न न ठरणे ही आता फक्त मुलग्यांची किंवा कुटुंबांची वैयक्तिक समस्या राहिली राहिली नाही. त्याला आता सामाजिक समस्येचे रूप आले आहे. अनेकदा लग्न न ठरणाऱ्या उपवर मुलांनी मोर्चा काढल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. भारतीय समाजात विवाहाला खूप महत्त्व असून याला सामाजिक, कौटुंबिक आणि सांस्कृतिक आशय आहे.
विशेष म्हणजे अलीकडच्या काळात मुली खूप शिक्षण घेत आहे. लग्नापूर्वीच त्या आपल्या पायावर उभे राहत आहेत. साहजिकच त्यांना आयुष्यभराचा जोडीदार देखील सुशिक्षित आणि नोकरी करणारा पाहिजे. परंतु अनेक तरुण शेतीमध्ये जास्त कमाई होत असल्याने नोकरी सोडून देत आहेत. शिवाय, खेड्यात राहणाऱ्या मुली शहरात राहू शकतात पण शहरातून मुली खेड्यात राहत नाहीत.
Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा
इतरही आहेत कारणे
जरी सध्याच्या काळात प्रेमविवाह, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहांस काही अंशी मान्यात मिळत असली, तरी साधारणतः ९० टक्के विवाह घरच्यांच्या मान्यतेनुसार होत आहेत. मुली न मिळाल्यानं ग्रामीण भागातील वय उलटून जाणाऱ्या तरुणांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मुलींची सुरक्षित आर्थिक जीवन एवढी अपेक्षा नसते. या मुलींना शहरी वातावरण, गृहसंकुलातील आधुनिक सोयी असणारे राहणीमान, स्वत:च्या करियरसाठी आणि पुढे मुला-बाळांसाठी असणाऱ्या शैक्षणिक सुविधा अशा एकूणच मध्यमवर्गीय जीवनाची आकांक्षा असते.
Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन