Gram Panchayat Mahaegram App । आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी ग्रामपंचायत मधून वेगवेगळ्या दाखल्यांची गरज नेहमीच भासत असते. यामध्ये जन्माचा दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे इत्यादी दाखल्यांचा समावेश असतो. आपल्याला जर सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा काही इतर काम करायचे असेल तर सदरील दाखले अनिवार्य असतात. ज्यावेळी आपल्याला अचानक याची गरज भासते त्यावेळी आपण ग्रामपंचायत मधून ते काढतो मात्र अशावेळी आपल्याला अचानक ते उपलब्ध होत नाहीत. मग यासाठी नेमका पर्याय काय? आपण ते दाखले कुठे पाहू शकतो? याबाबत माहिती जाणून घेऊयात.
तुम्हाला ग्रामपंचायत मधून एखादा दाखला अर्जंट मध्ये लागला तर टेन्शन घ्यायची गरज नाही आता ग्रामपंचायतचे दाखले तुम्ही मोबाईलवर देखील पाहू शकणार आहात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ग्रामपंचायतचे दाखले मोबाईलवरती कसे पाहायचे? त्यासाठी तुम्हाला खालील काही स्टेप्स फॉलो करायचे आहेत. (Gram Panchayat Mahaegram App)
१) सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मध्ये प्ले स्टोअर ओपन करून त्यामध्ये Mahaegram असे सर्च करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला Mahaegram Citizen Connect (Early Access) हे अँप इंस्टॉल करायचे आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ते ॲप ओपन करा नंतर त्या ठिकाणी तुम्हाला ॲपच्या काही परमिशन्स विचारल्या जातील त्या तुम्हाला allow करायच्या आहेत.
२) वरील सर्व प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला नवीन पेजवर तुमचे अकाउंट तयार करायचे आहे. त्यासाठी Don’t have account? Register या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला तुमचे या ठिकाणी अकाउंट तयार करता येईल. अकाउंट तयार करण्यासाठी पुढील पेज ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचे पूर्ण नाव टाकायचे आहे. यामध्ये तुमचे लिंग म्हणजे तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात हे टाकायचे आहे. त्याचबरोबर तुमची जन्मतारीख टाकायची आहे नंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाकून जतन करा या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
३) त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकला असेल त्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो तुम्हाला दिलेल्या जागी टाकायचा आहे. आणि त्यानंतर Conform या बटन वर क्लिक करायचे आहे. यानंतर तुमचे अकाउंट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर व पासवर्ड आला असेल तो दिलेल्या जागी टाकून तुम्हाला लॉगिन करायच आहे.
४) ही सर्व प्रक्रिया झाल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडावा लागेल. त्यानंतर तुमचा तालुका कोणता आहे? आणि नंतर तुमचे गाव किंवा तुमची ग्रामपंचायत कोणती आहे? हे सर्व निवडून तुम्हाला सबमिट करावे लागेल.
५) यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन दिसतील जसे की दाखले भरणे, कर भरणा वगैरे त्यामध्ये तुम्हाला दाखले पाहिजे असतील तर दाखले भरणे यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही जन्म दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, दारिद्र्यरेषेखालील दाखला असे विविध प्रकारचे दाखले तुम्ही काढू शकता.