Success story

Success story । नोकरीला केला जय महाराष्ट्र! फळशेतीतून हा शेतकरी कमावतोय लाखो रुपये

यशोगाथा

Success story । शेतकऱ्यांना पारंपरिक पिकातून अपेक्षित असे उत्पन्न मिळत नाही त्यामुळे शेतकरी आता आधुनिक पिकांकडे वळू लागले आहेत. आधुनिक पिकांमधुन (Modern crops) शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळत आहे. हल्ली शेतकरी फळशेतीची लागवड (Orchard cultivation) करत आहेत. फळशेतीमधून देखील शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळत आहे. काहीजण तर लाखो रुपयांची नोकरी सोडून फळशेती करत आहेत.

Success Story । 5 गायींपासून दुग्धव्यवसाय सुरू केला, आता दररोज 650 लिटर दूध विकते, वाचा या महिलेची यशोगाथा

राज्यात आता मोसंबी, डाळिंब, केळी यासारख्या फळ पिकांचे उत्पादन घेण्यात येत आहे. निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील प्रयोगशील शेतकरी भरत बोलीज (Bharat Bolij) यांनी देखील फळबागेतून चांगली कमाई केली आहे. विशेष म्हणजे बोलीज हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.

Success Story । परदेशी भाजीपाला लागवडीमुळे ६८ वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याचे नशीब पालटले; लाखोंचे उत्पन्न, जाणून घ्या कस केलं नियोजन?

नोकरीला केला जय महाराष्ट्र

त्यांच्या वडिलांनी पाच बिघे क्षेत्रात द्राक्ष लागवड (Grape cultivation) केली होती. त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात औषधांवर जास्त खर्च केला होता. पण त्यांना द्राक्ष कवडीमोल दरात विकावी लागली. परंतु हतबल न होता त्यांनी विविध प्रजातीची फळ बाग तयार केली. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी १२ वर्षापासून कार्यरत असणाऱ्या नोकरीला रामराम ठोकला. एमएससी केमिस्ट्री नेट सेट पास असणाऱ्या बोलीज यांनी शेती करण्याचे ठरवले. (Orchard cultivation information)

Milk Subsidy । पशुपालका़ंसाठी महत्त्वाची बातमी, आता टॅगिंग असेल तरच मिळणार दुध अनुदान

तयार केली फळशेती

त्यांनी आपल्या शेतीत तैवान जातीचे पेरूची बाग, अँना जातीचे शिमला वाण आणून त्यांना घरी कलम करत सफरचंद लागवड केली. पायनपल एमडी टू , काश्मिरी रेड बोर, बारामाही फळ असणारा केसर आंबा, चिकू, नारळ, खजूर, तुल डा पोलिमार्फ प्रजाती, केळी, ड्रॅगन आणि यलो ड्रॅगन, नागपुरी संत्रा, जम्बो मोसबी, ग्रेप फ्रुट, अंजीर आदींसह विविध प्रजाती असणारी ४० ते ५० फळ देणारी बाग तयार केली आहे.

Agriculture Technology । शेतातील कामे होणार झटपट, स्थानिक जुगाडातून शेतकऱ्याने बाईकचे रूपांतर केले मिनी ट्रॅक्टरमध्ये, जाणून घ्या त्याची खासियत

यातून त्यांनी वार्षिक २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना हमखास मिळत आहे. त्यांनी गेल्या ४ वर्षापासून फळबागेची लागवड केली असून त्यांना कमी कालावधीमध्ये अधिक उत्पन्न मिळत आहे. नोकरी आणि पारंपारिक शेतीला फाटा देत बोलीज आज लाखो रुपयांची कमाई करत आहे, त्यामुळे इतर शेतकरी त्यांच्यापासून प्रेरणा घेत आहेत.

Fisheries । शेणापासून माशांचे खाद्य तयार करा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *