Milk Rate

Milk Subsidy । पशुपालका़ंसाठी महत्त्वाची बातमी, आता टॅगिंग असेल तरच मिळणार दुध अनुदान

पशुसंवर्धन

Milk Subsidy । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर कमालीचे घसरले आहेत. घसरलेल्या दरांमुळे दूध उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. शिवाय पशुखाद्य देखील खूप महाग झाले आहे. शेतकरीवर्ग दुधाचे दर वाढवण्यासाठी आक्रमक झाले असून ठिकठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळत आहे.

Battery Operated Spray Gun । ‘या’ बॅटरीवर चालणाऱ्या स्प्रे गनच्या सहाय्याने शेतातील फवारणी होणार झटपट; जाणून घ्या याबद्दल अधिक माहिती

सहकारी दूध संघ व खासगी दूध प्रकल्पांमार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान केवळ ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी मिळणार आहे. त्यासाठी नियमावलींचे काटेकोर पालन केले जावे असे, दुग्ध व्यवसाय विकास आयुक्त प्रशांत मोहोड यांनी दूरदृश्‍यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत स्पष्ट केले आहे.

काही एजंट शेतकऱ्यांच्या नावाखाली दुध गोळा करत होते. या एजरांना आता मोठा धक्का बसला आहे. कारण आता टॅगिंग असेल तरच दुधाचे अनुदान मिळाणार आहे. परंतु याला काही डेअरीचालक विरोध करत आहेत.

LPG Cylinder । घरबसल्या Whatsapp वरुन बुक करा गॅस सिलेंडर, कसं ते जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

कोणत्याही माहितीच्या आधारावर अनुदान वाटप केले जाणार नाही. दुधाळ गायीचे टॅगिंग केले नसेल तर अनुदान मिळणार नाही, अशी भूमिका सरकारकडुन घेण्यात आली आहे. यासाठी पशुपालक शेतकऱ्याचा आधार क्रमांक, दुधाळ गायीचा टॅगिंग क्रमांक, आणि बॅंक खाते क्रमांक एकमेकांशी संलग्न करण्याचा निर्णय अनुदानवाटपासाठी घेतला आहे.

Agriculture Technology । शेतातील कामे होणार झटपट, स्थानिक जुगाडातून शेतकऱ्याने बाईकचे रूपांतर केले मिनी ट्रॅक्टरमध्ये, जाणून घ्या त्याची खासियत

त्यामुळे आता शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी सरकारने आयसीआयसीआय बॅंकेच्या मदतीने एक अॅप्लिकेशन तयार केले आहे. या अॅप्लिकेशनवर संकलित होणारी माहिती अनुदान वितरणासाठी वापरण्यात येईल. प्रतिलिटर २७ रुपये दर अदा केल्याचा पुरावा दिला असेल तरच अनुदान मिळणार आहे. त्यामुळे एजंटांकडून दूध खरेदी करणाऱ्या काही डेअरीचालकांना मोठा धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *