Fenugreek Rate । राज्यात पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळे सध्या उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत अनेक ठिकाणी उन्हाळा ऋतू मध्ये जसे ऊन पडते तसे ऊन जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची शेतपिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहेत. हवामानातील बदलाचा फटका हा भाजीपाल्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. यामध्ये मेथीच्या उत्पादनाला देखील मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मेथीच्या उत्पादनात मोठी घट झाल्याने मेथीला चांगला बाजार भाव मिळतोय. (Fenugreek Rate)
Havaman Andaj । राज्यातील ‘या’ भागामध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; वाचा हवामान विभागाचा अंदाज
एपीएमसी बाजारामध्ये मेथीची आवक घटली असून मेथीच्या दरामध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारामध्ये गृहिणींना मेथीच्या एका जुडीसाठी तर चक्क पन्नास रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे अनेक गृहिणींचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले आहे. गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले असले तरी मेथी उत्पादक शेतकऱ्यांना मात्र याचा चांगला फायदा होत आहे.
Wheat varieties । गव्हाच्या ‘या’ 3 जाती 6 महिन्यांत जबरदस्त उत्पादन देतात; जाणून घ्या सविस्तर माहिती
सध्या श्रावण महिना चालू आहे. त्यामुळे अनेकजण मांसाहार खाणे टाळतात आणि शाकाहार घेतात. यामुळे भाज्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. मात्र भाज्यांची मागणी वाढल्यामुळे आणि आवक घटल्यामुळे पालेभाज्यांचे दर सध्या गगनाला भिडल्याचे पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत आहे.
मेथीला किती भाव मिळतोय?
सध्या हवामान बदलामुळे मेथीच्या उत्पादनामध्ये चांगलीच घट झाली आहे. त्याचबरोबर मेथीला बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे मेथीचे दर वाढले असल्याचे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. दरम्यान एपीएमसी भाजीपाला बाजारात मेथीची अवघी 50 टक्के आवक होत आहे परिणामी मेथीच्या भावामध्ये वाढ झाली असून प्रतिजुडी २० ते २५ रुपयांना विक्री होत आहे.
Sandalwood Plantation । करोडोंची कमाई करायची असेल तर आजच करा चंदन लागवड, अशी करा सुरुवात