Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मागच्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नागपूर सारख्या ठिकाणी तर पावसाने हाहाकार घातला आहे. या ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूरसह इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. राज्यभर हलक्या ते मध्यम सरी पडत असल्याने शेतकऱ्यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, सध्या देखील राज्यातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून काही तासातच पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना? जी शेतकऱ्यांना ठरतेय खूप फायदेशीर
त्याचबरोबर, पुढील चार दिवस राज्याच्या अनेक ठिकाणी पाऊस हजेरी लावणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. यामध्ये मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. दुपारनंतर अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढला आहे. तर काही ठिकाणी पूर आल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
Chopan land । चोपण जमीनीची सुधारणा कशी करावी? जाणून घ्या याबद्दल माहिती
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उद्या संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, नांदेड, जालना त्याचबरोबर खानदेशातील जळगाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, नाशिक, आणि कोकणातील रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
Cashew Farming । काजूची शेती करून तम्ही बनू शकताय करोडपती; जाणून घ्या कशी करायची लागवड?