Havaman Andaj । रविवारच्या दिवशी जवळपास सर्वांना सुट्टी असते यामुळे सर्वजण बाहेर फिरण्यासाठी जातात. सध्या गणेशोत्सव सुरू असल्याने सर्वजण आता गणपती पाहण्यासाठी घराबाहेर पडतील. मात्र घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने एक मोठी अपडेट दिली आहे ते जाणून घेऊनच तुम्ही घराबाहेर पडा. हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे त्याचबरोबर विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा दोर कमी राहील असा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे.
Harbhara Rate । हरभऱ्याला आज बाजारात किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भातील वर्धा, वाशिम, यवतमाळ, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, अमरावती, चंद्रपूर, भंडारा, अकोला, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्र, सोलापूर कोकणातील रायगड, रत्नागिरी, ठाणे या शहरांमध्ये 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Soybean Rate । आज सोयाबीनची बाजारातील परिस्थिती कशी? जाणून घ्या एका क्लिकवर
पुण्यातील पावसाबाबत पाहिले तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये शुक्रवारी दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली अशातच आता पुण्यात पावसाची संततधार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
Havaman Andaj । सावधान! काळे कुट्ट आभाळ अन् येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस
‘या’ जिल्ह्यात कोसळणार पावसाच्या सरी
मुंबई, जालना, रायगड, धुळे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, जळगाव, अहमदनगर, सातारा, लातूर, परभणी, बीड आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर पुढील 24 तासात कोकणासह विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.
Havaman Andaj । सावधान! काळे कुट्ट आभाळ अन् येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस