Power Tiller । पूर्वी शेतीच्या कामांसाठी बैलांचा वापर केला जात होता. परंतु आता त्याऐवजी यंत्राचा वापर केला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता या यंत्रासाठी सरकारकडून आर्थिक मदत केली जात आहे. परंतु यंत्रांची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू लागला आहे. सध्या बाजारात एक असे यंत्र आले आहे ज्याच्या मदतीने शेतीची कामे आणखी सोयीस्कर होणार आहे.
शेतकऱ्यांसाठी पॉवर टिलर हे यंत्र बाजारात आले आहे. याच्या मदतीने शेतकऱ्यांना नांगरणी, खुरपणी तसेच औषध फवारणीपर्यंत अनेक कामे करता येणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या यंत्राच्या मदतीने शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. कोणालाही हे मशीन चालवता येते. शिवाय ते पेट्रोल आणि डिझेलवर चालते. या मशीनला रोटाव्हेटर,पॉवर स्प्रेअर, कापणी यंत्र, ट्रॉली, कल्टीव्हेटर यांसारखे अवजारे जोडता येतात.
फायदे
नांगरणी ते पेरणीपर्यंतची अनेक कामे सोयीस्कर होतात
या मशीनमध्ये वॉटर पंप टाकून तलाव, नदी आणि इत्यादीमधून पाणी काढता येते.
पॉवर टिलर हे मशीन वजनाने हलके असल्याने त्याची वाहतूक आपण कोठेही करु शकतो.
सरकारी अनुदान
सरकारकडून 8 हॉर्सपावर के टिलर वर साधरण ४० टक्के आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदान मिळते. या मशीनची किंमत १ लाख रुपये इतकी आहे.
असे मिळवा अनुदान
या अनुदानाचा लाभ केवळ अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळतो. जर शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर मशीन घेताना पुर्ण पैसे भरावे लागतील, त्यानंतर अनुदानाचा लाभ मिळेल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्हा कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन याची नोंदणी करावी लागणार आहे. तसेच याबाबत कृषी विभागाला एक प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागणार आहे. त्यानंतर कृषी विभाग तुम्हाला संपर्क साधेल.