Desi jugad

Desi Jugad । शेतकरी बापाने मुलासाठी केले भन्नाट जुगाड; व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल चकित

बातम्या

Desi Jugad । जुगाड करण्याबाबत भारतीय लोकांच्या डोक्याला कोणीच डोकं लावू शकत नाही असं सतत म्हटलं जातं. कारण याची उदाहरणे देखील तशी समोर येत असतात. भारतीय लोकांनी जुगाड केलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात जे पाहून अनेक जण थक्क देखील होतात. (Desi Jugad)

सध्या देखील एक अतरंगी जुगाड समोर आले आहे. एका दूधवाल्याने आपल्या लहान मुलाला घेऊन बाईकवर अतिशय वेगळ्या पद्धतीने प्रवास केला आहे. या शेतकरी बापाने मुलाला बसवण्यासाठी जी जागा निवडली आहे ती पाहून खरच तुम्ही देखील चकित व्हाल.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला त्याच्या वडिलांच्या मागे गाडीवर न बसता एका दुधाच्या भांड्यात बसला आहे याचं कारण असं की, तो वयाने खूप छोटा आहे आणि जर तो बाईकवर बसला तर खाली पडण्याची शक्यता आहे त्यामुळे या दूध वाल्याने एक अनोखी शक्ती लढवत त्या मुलाला दुधाच्या भांड्यात उभे केले आहे.

शेतकऱ्याने हे भांड बाईकच्या पाठीमागे कॅरिअरला अडकवल आहे त्यामुळे आता हा मुलगा बाईक वरून खाली पडण्याची देखील भीती नाही. आणि जर तो बाईकवर वरून खाली पडला तर तो भांड्यात उभा असल्यामुळे त्याला दुखापत होणार नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांने देखील ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत १० लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *