Wheat varieties

Wheat varieties । गव्हाच्या ‘या’ 3 जाती 6 महिन्यांत जबरदस्त उत्पादन देतात; जाणून घ्या सविस्तर माहिती

कृषी सल्ला बातम्या

Wheat varieties । भारतात शेतकरी त्यांच्या शेतीसाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. यावेळी कृषी शास्त्रज्ञांनी गव्हाच्या 3 नवीन जाती विकसित केल्या आहेत ज्यामुळे केवळ चांगले उत्पादन मिळणार नाही तर रोगांवर देखील हे खूप फायदेशीर आहे. चलातर मग जाणून घेऊया गव्हाच्या सुधारित वाणांबद्दल माहिती. ज्यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादन आणि नफा मिळू शकते. पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे गव्हाच्या उत्पादनावरही परिणाम होत आहे. या स्थितीत, शास्त्रज्ञांनी सुधारित उत्पादनासह तापमानातील बदलांना तोंड देण्यासाठी उष्णतेची लाट प्रतिरोधक गव्हाच्या जाती विकसित केल्या आहेत.

गव्हाच्या तीन जाती कोणत्या?

१) DBW-371 (करण वृंदा)

या गव्हाच्या जातीची लागवड बागायती भागात लवकर केली जाते. त्याची उत्पादन क्षमता 87.1 क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि सरासरी उत्पादन 75.1 क्विंटल प्रति हेक्टर आहे. त्याच्या झाडांची उंची 100 सेमी आहे आणि पिकण्याचा कालावधी 150 दिवस आहे. या जातीमध्ये १२.२% प्रथिने, ३९.९ पीपीएम जस्त आणि ४४.९ पीपीएम लोह असते.

२) DBW-370 (करण वैदेही)

या जातीची उत्पादन क्षमता ८६.९ क्विंटल प्रति हेक्टर असून सरासरी उत्पादन ७४.९ क्विंटल प्रति हेक्टर आहे. रोपांची उंची 99 सेमी आहे आणि परिपक्वता कालावधी 151 दिवस आहे. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १२.०%, जस्त ३७.८ पीपीएम आणि लोह ३७.९ पीपीएम आहे.

DBW-372 (करण वरुण)

या जातीची उत्पादन क्षमता 84.9 क्विंटल प्रति हेक्टर असून सरासरी उत्पादन 75.3 क्विंटल प्रति हेक्टर आहे. रोपांची उंची 96 सेमी आहे आणि परिपक्वता कालावधी 151 दिवस आहे. या जातीमध्ये प्रथिनांचे प्रमाण १२.२%, जस्त ४०.८ पीपीएम आणि लोह ३७.७ पीपीएम आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

या गव्हाच्या वाण सर्व प्रमुख रोगजनकांच्या प्रकारांना प्रतिरोधक आहेत आणि सुधारित उत्पादन तसेच तापमानातील बदलांच्या प्रभावापासून संरक्षण देतात. यापैकी DBW-370 आणि DBW-372 शेतकर्‍यांसाठी कर्नाल बंट रोगास अधिक प्रतिकारशक्ती देतात. पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, जम्मू-कठुआ, हिमाचल प्रदेशातील उना जिल्हा आणि पोंटा खोरे, तराई प्रदेश या देशातील गंगा-सिंधू प्रदेशात हे गव्हाचे उत्पादन अतिशय उपयुक्त आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *