Chopan land । चोपण जमिनीचे विनीमययुक्त सोडियमचे प्रमाण शेकडा १५ पेक्षा जास्त असते. विद्राव्य क्षारांची विद्युतवाहकता ४ डेसी सायमन प्रति मीटर पेक्षा कमी असते व सामू ८.५ ते १० पर्यंत असतो. जमिनीतून पाण्याचा समाधानकारक निचरा होत नाही. वाळल्यावर जमीन टणक होते, भेगा पडतात, ओल्यापणी अतिशय चिबड होते. अशा जमिनीत हवा खेळती राहत नाही व त्यामुळे पिकांची वाढ योग्य होत नाही. त्यामुळे चोपण जमिनीमध्ये पिके चांगली येण्यासाठी त्यामध्ये सुधारणा कशी करावी जाणून घेऊयात.
चोपण जमिनीची सुधारणा
१. जमिनीला १ टक्का उतार द्यावा.
२. जमिनीखाली सच्छिद्र पाईप टाकून पाण्याचा भूमिगत निचरा करावा.
३. जमीन सपाट करून योग्य अंतरावर चर काढावेत.
४. माती परिक्षण करून जिप्सम, गंधक, आयर्न पायराईट यासारख्या भुसुधारकांचा वापर करावा. जमिनीमध्ये गरजेनुसार
सर्वसाधारणपणे ५ ते १० टन प्रति हेक्टरी जिप्सम शेणखतात मिसळून टाकावे.
५) चुनखडीयुक्त चोपण जमिनीत गंधक १ टन किंवा आयर्न पायराईट २ टन ही मुसुधारके शेणखतात मिसळुन वापरावीत. भुसुधारके दिल्यानंतर भरपूर पाणी द्यावे. त्यामुळे जमिनीतील क्षार वाहून जाण्यास मदत होते. जमिनीतील सोडियमचे प्रमाणही कमी होऊन जमिनीची जडणघडण सुधारते.
६. क्षारांचा निचरा केल्यानंतर अशा जमिनीत शुगरबीट, बार्ली, बरसीम, भात, गहू, ऊस, कापूस यासारखी क्षारसहनशील पिके घ्यावीत.
Cashew Farming । काजूची शेती करून तम्ही बनू शकताय करोडपती; जाणून घ्या कशी करायची लागवड?
७. सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा.
८. पिकाच्या फेरपालटीत धैंचा हे हिरवळीचे पीक घ्यावे..
९. माती परीक्षण करून नत्रयुक्त खते शिफारशीपेक्षा २५ टक्के वाढवून घ्यावीत.
१०. माती परिक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर कमतरतेनुसार शेणखतात एक आठवडा मुरवून करावा. असे केल्यास तुमच्या चोपण जमिनीची सुधारणा होईल.
Maharashtra Rain Update । राज्यभर पावसाचे पुनरागमन, मराठवाड्यात अतिवृष्टी होऊन पिकांचे मोठे नुकसान