Havaman Andaj । सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाने बरसायला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. ऐन पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे आता यावर्षी पाऊस रडवणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. (Havaman Andaj )
हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यात 15 सप्टेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे. राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पाऊस कोसळणार असून विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा जोर जास्त असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. त्यानंतर सप्टेंबर महिना सुरू होताच काही दिवस पाऊस पावसाला सुरुवात देखील झाली मात्र सध्या पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जर काही दिवसात पाऊस पडला नाही तर खरी पिक वाया जाण्याची शक्यता नाकार,णार नाही. त्यामुळे चांगल्या दमदार पावसाची आशा शेतकऱ्यांना लागून राहिली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 14 सप्टेंबर पर्यंत कोकण व्यतिरिक्त उर्वरित महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर कमी असणार आहे. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर पाऊस सक्रिय होऊन याचा परिणाम कोकण, कोल्हापूरसह पश्चिमेकडील घाटमाथ्यावरील परिसरात दिसून येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.