Rain Update । अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर सध्या कुठे पावसाला सुरुवात झाली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या काही भागात आज जोरदार पाऊस झाला असल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या आहेत. राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस होत असला तरी आज दिवसभर काही ठिकाणी ऊन सावल्यांचा खेळ देखील सुरू होता. दरम्यान हवामान विभागाने आज आणि उद्या राज्यांमध्ये ठीक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. (Rain Update)
हवामान खात्याने राज्यभर पाऊस पडेल असा अंदाज दिला होता. त्यानुसार राज्याच्या अनेक भागात पाऊस देखील झाला. रायगड, भंडारा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल असा अलर्ट हवामान विभागाने दिला होता. तर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळता राज्यभर जोरदार पावसाचा येलो देखील जारी करण्यात आला होता. राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस झाला असला तरी बहुतांश भागात शेतकरी अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
घरच्या घरी सोप्या पद्धतीने मुरघास कसा तयार करावा? वाचा सविस्तर माहिती
हवामान विभागाने उद्या देखील राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. याच पार्श्वभूमीवर येलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. यामध्ये विदर्भातील, बुलढाणा, वाशिम, अमरावती, अकोला, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
त्याचबरोबर मराठवाड्यातील, जालना, छत्रपती संभाजीनगर तसेच खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. तसेच या ठिकाणी देखील यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्याच्या इतर भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळतील असा देखील अंदाज हवामान विभागाने दिला आहे.