Electric motor without light । शेती करताना पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. जवळपास सर्वच शेतकरी मोटरने शेतीला पाणी देतात. जसे शेतीला पाणी महत्त्वाचे आहे तसेच वीजदेखील खूप महत्त्वाची आहे. सध्या पाऊस पडला नसल्याने विजेची टंचाई निर्माण झाली आहे. अगोदरच पाण्याची टंचाई त्यात विजेची समस्या त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येते.
सध्या पाऊस पडत नसल्याने अनेक शेतकरी विजेचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. त्यामुळे विजेचे बिल खूप जास्त येत आहे. हीच समस्या लक्षात घेता इंदापूरच्या एका शेतकऱ्याने भन्नाट आयडिया शोधून काढली आहे. ज्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. या शेतकऱ्याने विजेशिवाय चालणारी इलेक्ट्रिक मोटर तयार केली आहे.
विजेशिवाय चालणारी मोटर
सततच्या विजेच्या कटकटीतून सुटका व्हावी, कमीत कमी वेळेत काम व्हावे यासाठी या शेतकऱ्याने हा जुगाड केला आहे. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक तरुण या व्हिडिओमध्ये इंजिन हाताने सुरू करीत आहे. मोटर मधून पाणी सुरू होऊन ठिकाणी असणाऱ्या बोर्ड मध्ये पटकन बल्ब देखील लागल्याचे पाहायला मिळत आहे.
मोटर मधून बाहेर येणारे पाणी थेट एका मशीन वरती पाडत आहे. या साह्याने पुढचे मशीन गोल फिरत आहे. या प्रक्रियेतून बाहेर पडणारे पाणी बाजूच्या शेतामध्ये जात आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या तरुण शेतकऱ्याचा हा भन्नाट जुगाड बघायला आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी गर्दी करत आहेत. त्याच्या संकल्पनेचं कौतुक देखील होत आहे.
युट्युब व्हिडिओ
दरम्यान, असे शेतकऱ्यांनी बनवलेलं जुगाड सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. बऱ्याच वेळा या शेतकऱ्यांना युट्युबवर व्हायरल होणारे व्हिडिओ पाहून प्रेरणा मिळते. त्यातून त्यांनी बनवलेलं हटके जुगाड पाहून मोठं मोठे इंजिनियरही कोड्यात पडतात. या जुगाडाचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो.