Government Schemes । 1 मे 2016 रोजी केंद्र सरकारनं गरीब कुटुंबातील महिलांपर्यंत गॅस पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सुरुवात केली. सरकारच्या या योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात येते. चुलीवर जेवण बनवताना महिलांना श्वसनासंबंधी वेगवेगळे आजार जडतात. यातून महिलांचा सुटका होऊन त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचवावा, यासाठी ही योजना सुरू केली आहे. (Pradhan Mantri Ujjwala Yojana)
सर्वसामान्यांसाठी एक आनंदाची बाब आहे. या योजनेंतर्गत नवीन एलपीजी कनेक्शनला मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 1,650 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. दरम्यान, पहिल्या कॅबिनेट बैठकीत केंद्र सरकारकडून एकूण 33 कोटी ग्राहकांच्या एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी करण्यात आल्या होत्या. आता 75 लाख नवीन एलपीजी कनेक्शन मिळणार आहे. या योजनेंतर्गत ग्राहकांना 400 रुपये प्रति सिलिंडर स्वस्त दिले जात आहेत.
पात्रता
वार्षिक उत्पन्न 27 हजार रुपयांपेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबाला आणि दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्याच कुटुंबांना कार्ड जारी करतात. अर्ज करणाऱ्या महिलेचे वय १८ वर्षे असावे. तसेच लाभार्थी कुटुंबाकडे अगोदरपासून कोणत्याही गॅस एजन्सीकडून इतर कोणतेही एलपीजी कनेक्शन घेतलेले नसावे. सर्वसामान्य गरीब, अनुसूचित जाती, जमाती आणि अत्यंत मागासवर्गीय कुटुंबांना योजनेचा लाभ मिळेल.
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- बीपीएल कार्ड
- मोबाइल नंबर
- वय प्रमाणपत्र
- बीपीएल यादीतील नाव मुद्रण
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- रेशनकार्डची छायाचित्र प्रत
- बँक फोटो कॉपी
असा करा अर्ज
योजनेत सहभागी होण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर Pradhan Mantri Ujjwala Yojana-PMUY च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
तुमच्यासमोर मुख्यपृष्ठ येईल तेथे डाऊनलोड फॉर्मवर क्लिक करा.
त्यानंतर पंतप्रधान उज्ज्वला योजना फॉर्मवर क्लिक करा.
तुमच्या समोर एक फॉर्म येईल तो डाऊनलोड करा.
येथे विचारण्यात आलेली सर्व माहिती भरा. जसे की तारीख, अर्जदाराचे सर्व नाव, ठिकाण भरल्यानंतर तुमच्या जवळच्या एलपीजी केंद्रावर सादर करा.
सर्व कागदपत्रे द्या. या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.