Havaman Andaj

Havaman Andaj । नागरिकांना सावधानतेचा इशारा! पुढील तीन दिवस ‘या’ जिल्यात कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्याचे अपडेट

हवामान

Havaman Andaj । सध्या राज्यभर पावसाने दडी मारली आहे. काही भागात हलका ते काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. दरम्यान सध्या राज्यातील शेतकऱ्यांना पावसाची खूप गरज आहे. पाण्याविना पिके सुकू लागली आहेत. काही ठिकाणी तर पिके करपली आहेत. दरम्यान आता पावसाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Water Supply With Tanker । राज्यातील 2 हजारांपेक्षा जास्त गावांमध्ये टॅंकरने पाणीपुरवठा; समोर आली धक्कादायक आकडेवारी

हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबई, कोकणात मात्र मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आल्याची माहिती देखील ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

Abdul Sattar । मोठी बातमी! कांद्याचे लिलाव बंद ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर होणार कडक कारवाई; अब्दुल सत्तार यांचे आदेश

24 ते 26 सप्टेंबर दरम्यान या भागात कोसळणार पाऊस

ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून म्हणजे पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे. तर मुंबई आणि कोकणामध्ये मुसळधार पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण आणि नंदुरबार, नाशिक जळगाव, अहमदनगर, धुळे आणि पुणे जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Havaman Andaj । सावधान! ‘या’ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

आज राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी पावसाची हजेरी

सप्टेंबर महिना चालू झाल्यापासून म्हणावा असा पाऊस पडला नव्हता. गणपती बसतील या दिवशी शेतकऱ्यांना पाऊस पडण्याची आशा होती. मात्र त्या दिवशी देखील पाऊस म्हणावा असा सापडला नाही मात्र आज राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बळीराजाला काहीसा दिलासा मिळाला आहे.

Market Price । उडीद, कांदा आणि सोयाबीनला आज बाजारात किती दर मिळाला; जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *