Havaman Andaj । जुलै महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी आपत्ती पाहायला मिळाली. दरम्यान, येत्या २४ तासांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर कोकण आणि पुण्यासह १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
LPG Price 1 August । ब्रेकिंग! एलपीजी सिलेंडर महागला, बजेटनंतर दर वाढले
हवामान खात्याच्या अंदाजानुसार बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. आयएमडीने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. (Rain Update )
जळगाव, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांसाठीही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पावसाची शक्यता लक्षात घेता मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली नांदेड जिल्ह्यांनाही यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Weather Update )
दरम्यान, 9 ऑगस्टनंतर राज्यातील पावसाचा जोर बराच कमी होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यानंतर राज्यातील 1-2 जिल्ह्यांमध्येच यलो अलर्ट देण्यात आला आहे.