Success Story । सध्याच्या तरुण पिढीला नोकरी मिळणे फार कठीण आहे. त्यामुळे अनेक तरुण आपल्याला नोकरी मिळावी यासाठी धडपड करतात. काही तरुण महागडे कोचिंग क्लासेस लावतात आणि नोकरीसाठी धडपड करत असतात. मात्र आपल्याकडे अजूनही असे काही लोक आहेत. जे चांगल्या पगाराची नोकरी सोडतात आणि व्यवसाय करण्याचे ठरवतात. आणि त्यामधून त्यांना यश देखील चांगले मिळते. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्याने 84 लाख रुपयांचे पॅकेज असलेली नोकरी सोडली आणि कपडे धुण्याचा व्यवसाय सुरू केला. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल.
बिहार मधील भागल्पुर जिल्ह्यातील एका तरुण उद्योजकाने तब्बल 84 लाख रुपये पॅकेज असलेले नोकरी सोडली आणि त्याच्या पत्नीसोबत वॉशिंग कंपनी सुरू केली. अरुणाभ सिन्हा असे या तरुणाचं नाव असून त्याने आपली पत्नी गुंजन हिच्यासोबत वॉशिंग कंपनी सुरू केली. सध्या त्यांचा हा व्यवसाय आज कोटी रुपयांमध्ये पोहोचला आहे.
Success Story । मेहनतीच्या जोरावर दाखवले करून! छायाताई दुग्ध व्यवसायात कमवताहेत बक्कळ पैसा
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, अरुणाभ सिन्हा यांचे शिक्षण आयआयटी मधून झाले असून ते नोकरी करत होते. यावेळी त्यांनी काही होस्टेलला देखील भेटी दिल्या. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, होस्टेलमध्ये किंवा इतर ठिकाणी कपडे धुण्याची सर्वात मोठी समस्या आहे. ही समस्या लक्षात घेऊन त्यांनी लॉन्ड्री व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि यामध्ये त्यांच्या पत्नीने देखील त्यांना मोठी साथ दिली आहे.
त्यांनी ऑगस्ट 2016 मध्ये नोकरीला रामराम ठोकला आणि जानेवारी 2017 मध्ये 20 लाख रुपये भांडवल गुंतवत युक्लीन नावाची लॉन्ड्री सेवा सुरू केली. एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी सोडून असा व्यवसाय करणे हे त्याच्या कुटुंबियांना आवडत नव्हते. सहाजिकच आहे कोणाच्याही कुटुंबीयांनाही आवडणार नाही . मात्र कोण काय म्हणते याच्याकडे लक्ष न देता अरुणाभने आपल्या व्यवसायावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले व 20 लाख रुपये गुंतवणुकीतून सुरू केलेला हा व्यवसाय शंभर कोटी रुपयांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे सध्या याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे.