Success Story । जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतेच काम अशक्य नसते. कोणत्याही कामात तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट केले की तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळतात. अमरावती जिल्ह्यातील घुसळी या गावच्या छाया देशमुख यांनीही मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे. दुग्ध व्यवसायातुन त्यांनी चांगली कमाई केली आहे. यशस्वी दुग्ध व्यवसायिक म्हणून आज त्यांची ओळख तयार झाली आहे.
परंतु त्यांची यशोगाथा पाहिली तर ती संघर्षाने भरली आहे. प्रत्येक पती आणि पत्नीमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वाद होत असतात. परंतु अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. असेच छायाताई सोबत झाले. टोकाच्या भांडणामुळे त्यांना पतीपासून विभक्त राहावे लागत आहे. तरीही त्या डगमगल्या नाहीत. माहेरच्या मदतीने त्यांनी व्यवसाय सुरु केला.
कर्ज काढून भरली मुलाच्या शाळेची फी
छायाताई अमरावतीपासून जवळ असणाऱ्या कामनापूर या ठिकाणी राहतात. त्यांच्या आई रेखा आणि मुलगा यश सोबत राहतात. 2001 ते 2019 मध्ये त्यांनी खानावळ व्यवसायाला सुरुवात केली. त्यांनी कर्ज काढून मुलाच्या शाळेची फी भरली. परंतु कोरोना काळात त्यांचा हा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे कर्जावर घेतलेले पैशांची फेड कशी करायची असा प्रश्न त्यांना पडला.
Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
पुढे त्यांना घर विकावे लागले. त्यांच्या वडिलांनी त्यांना चांदूर रेल्वे या ठिकाणी त्यांच्या नावे असणारा प्लॉट विकून दुग्ध व्यवसाय चालू करायचे ठरवले. वडिलांच्या अडीच एकर शेतात त्यांनी 40 बाय 30 फूट आकाराचा गोठा उभारला. त्यांनी एचएफ आणि जर्सी गाईंची खरेदी केली. दररोज 40 लिटर पर्यंत दूध संकलन सुरू झाले. त्यातून त्यांनी कर्ज फेडले आणि घरात आर्थिक मदत करू लागल्या.
परंतु तीन वर्ष हा व्यवसाय तोट्यात होता. त्यांच्या साथीला त्यांची बहीण वैशाली धावून आल्या. त्यांनी आपले मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे उभे केले. आज त्यांच्याकडे एकूण 12 गाई असून सत्तर लिटर दुधाचे संकलन त्या करतात. तसेच गाईंना चाऱ्यासाठी त्यांनी दोन एकरमध्ये चारा पिकांचे नियोजन केले. अशा पद्धतीने त्यांनी मेहनतीच्या जोरावर घवघवीत यश मिळवले आहे.