Sugar Export Ban

Sugar Export Ban । केंद्राचा मोठा निर्णय, साखरेच्या निर्यातीवर घातली बंदी

बातम्या

Sugar Export Ban । मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरात सतत वाढ (Sugar Price Hike) होत आहे. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन साखर खरेदी करावी लागत आहे. साहजिकच आधीच वाढलेली महागाई त्यात वाढलेल्या साखरेच्या दरामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Khandsari Sugar । सर्वात महागडी साखर! तुम्हीसुद्धा कमी खर्चात उद्योग सुरु करून कमवू शकता बक्कळ पैसा, वाचा सविस्तर

आता साखरेच्या निर्यातीवर सरकारने बंदी घातली आहे. महत्त्वाचे म्हणजे यात कच्ची साखर, शुद्ध साखर, पांढरी साखर आणि सेंद्रिय साखर यांचा समावेश असणार आहे. 31 ऑक्टोबर 2023 नंतर साखरेच्या निर्यातीवर बंदी (Ban on Sugar Export) कायम असेल. सणासुदीच्या हंगामात साखरेचे दर वाढले आहेत. खाद्यपदार्थांच्या वाढत्या किमतींमुळं लोक हैराण झाले आहेत.

Ujani Dam । मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्त्वाचे आदेश

त्यामुळे सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याच संदर्भात डीजीएफटीने एक अधिसूचना जारी केली आहे. युरोपियन युनियन आणि अमेरिका या बंदी अंतर्गत येत नसून इतर सर्व गोष्टी आणि नियमांमध्ये कोणताही बदल नसेल, असे अधिसूचनेत सांगितले आहे. दरम्यान, साखर कारखान्यांना 10 नोव्हेंबरपर्यंत NSWS पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

Animal Insurance । अवघ्या तीन रुपयांत मिळणार पशुविमा, लवकरच येणार मंत्रिमंडळात प्रस्ताव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *