Khandsari Sugar । तुम्ही कधी खांडसारी साखरेबद्दल ऐकलं आहे का? किंवा तुम्ही कधी खांडसारी साखर खाल्ली आहे का? गुळाला किंवा रिफाइंड न केलेल्या साखरेला उत्तरप्रदेशात खांडसारी असेही म्हणतात. खांडसारी साखर ही घट्ट उसाच्या रसापासून तयार करतात. ही साखर रिफाइंड नसली, तरी केमिकल मिश्रीत साखरेपेक्षा या साखरेला सर्वात जास्त मागणी असते.
Ujani Dam । मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्त्वाचे आदेश
जाणून घ्या किंमत आणि प्रकार
या साखरेला 150 रुपये किलो इतका दर (Khandsari Sugar Price) मिळतो. यात 94 ते 98 टक्के इतके सुक्रोजचे प्रमाण असते. या साखरेच्या दोन प्रकार आढळतात. पहिला प्रकार परंपरागत खांडसरी. यात रस शुद्धीकरणासाठी वनस्पतिजन्य पदार्थांचा वापर करतात. गूळ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा वापर करून राब बनवून त्यापासून खांडसरी साखर तयार करतात. बाजारातील मालाचे दर लक्षात घेता खांडसरी साखर किंवा गूळ बनवतात. यामुळे साखरेचा उतारा 4-5 टक्के पर्यंतच पडतो. (,Khandsari Sugar Information)
Animal Insurance । अवघ्या तीन रुपयांत मिळणार पशुविमा, लवकरच येणार मंत्रिमंडळात प्रस्ताव
दुसऱ्या प्रकारच्या खांडसरीमध्ये (ओ. पी. एस.) भेंडी वनस्पतीचा ठेचा न वापरता सल्फिटेशन पद्धत वापरतात. साखरेचे कण वेगळे करणे, स्फटिकीकरण आणि वाळविणे या प्रक्रिया यंत्राच्या मदतीने करतात. साखर उतारा साधारणपणे 7 ते 8.5 टक्के पडतो.
Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट
अशी केली जाते साखरप्रक्रिया
या साखरेच्या गाळपासाठी 3 लाट्यांपासून 9 लाट्यांपर्यंतच्या आडव्या चरकांचा वापर करतात. गाळप चांगले होण्यासाठी श्रेडरचे 2 संच आणि यांत्रिकी दाब देण्याची सोय असते. रसगाळप 75% मिळते. रस शुद्धीकरणासाठी सल्फिटेशन पद्धत वापरतात. त्यासाठी एका बंदगोलाकृती टाकीमध्ये रस घेतला जातो. त्यामध्ये चुन्याची निवळी मिसळून त्यात सल्फर डायऑक्साईड वायू सोडतात. ही क्रिया 15 मिनिटे चालते.
Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या
असे झाल्याने मूळ रसाची आम्लता कमी होते. रस अल्कली होऊन विद्राव्य पदार्थ मळीच्या रूपाने बाहेर पडून रस शुद्ध होतो. बॅग फिल्टरचा उपयोग करून रसाची गाळणी होते. रस आटविण्यासाठी उघड्या काहिलीचा वापर करतात. त्यातून तयार होणारा राब स्फटिकीकरण यंत्रात घालून घुसळण करतात. या राबापासून स्फटिक तयार होतो. स्फटिकीकरण झाल्यानंतर साखरेचे कण मळीपासून वेगळे करण्यासाठी सेंट्रिफ्युज मशीनचा वापर करतात. साखरेचे कण पाण्याने धुऊन ड्रायरच्या मदतीने किंवा उन्हात वाळवून साखर तयार करतात.
Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा