Tractor New Update । आपल्याकडे अनेक शेतकरी हे शेती या व्यवसायावर अवलंबून आहे. शेती हा व्यवसाय करताना शेतकऱ्यांना अनेक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. यामध्ये सर्वात महत्त्वाचे तंत्रज्ञान म्हणजे ट्रॅक्टर अगदी बागायतदार शेतकऱ्यांपासून ते एक-दोन एकर क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना देखील शेती करताना कायमच ट्रॅक्टरची गरज भासत असते. जसे जसे तंत्रज्ञान बदलत आहे तसे तसे ट्रॅक्टर मध्ये देखील बदल होत आहेत. शेतकरी आता जास्त हाय एचपी ट्रॅक्टर खरेदी करत आहेत. (Tractor New Update )
दर्जेदार गूळ आणि काकवी तयार करण्याचे सुधारित तंत्र; जाणून घ्या सविस्तर
अलीकडच्या वर्षात हाय एचपी ट्रॅक्टरच्या बाजारपेठेत मोठी वाढ होताना दिसत आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हाय एचपी ट्रॅक्टरच्या मदतीने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते आणि तंत्रज्ञानाबद्दल त्यांची समज देखील वाढते असे मानले जाते. शेतीव्यतिरिक्त वेगवेगळ्या व्यवसायांमध्ये ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ज्यामध्ये खाणकाम असेल बांधकाम आणि वाहतूक अशा वेगवेगळ्या कामांसाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. यासाठी हाय हॉर्स पावर ट्रॅक्टरची आवश्यकता असते.
यामुळे वाढली ट्रॅक्टरची मागणी
अलीकडच्या काळातील शेतकरी ट्रॅक्टरचा उपयोग फक्त शेतीतच करत नाही तर ते खाणकाम, बांधकाम, वाहतूक आणि लहान घरगुती कामांसाठी देखील ट्रॅक्टरचा वापर करतात. केयरएजच्या अहवालानुसार देशांमधील एकूण ट्रॅक्टरच्या मागणी पैकी सुमारे 30 टक्के ट्रॅक्टरचा वापर आता बिगर कृषी कारणांसाठी केला जात आहे.
शेतकरी शेतीतील यांत्रिकीकरणाचे फायदे ओळखत आहेत त्यामुळे ट्रॅक्टरसह विविध शेती अवजारे वापरून त्यांची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न कायम शेतकरी करत आहेत. या वाढत्या मागणीमुळे आणि माहितीमुळे भारतीय बाजारपेठेत हाय एचपी ट्रॅक्टरची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे.
Havaman Andaj । मोठी बातमी! गणेश विसर्जनाच्या दिवशी ‘या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; अलर्टही जारी