Crop Insurance

Crop Insurance । पीक विम्यावरून ठाकरे गटाची आक्रमक भूमिका, पीक विमा कार्यालयात तोडफोड

बातम्या

Crop Insurance । दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे चांगलाच कचाट्यात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही शेतकरी कर्जाची (Agri loan) परतफेड न करता आल्याने आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत आहेत.

Pearl Farming । घरबसल्या करता येते मोत्याची शेती, कमी खर्चात दरमहा लाखोंचा नफा, जाणून घ्या ही पद्धत

पीक विमा कार्यालयात तोडफोड

सरकारने (Government) एक रुपयात पीक विमा योजनेची (Insurance schemes) घोषणा करूनही शेतकऱ्यांना त्याचा खूप कमी लाभ मिळत आहे. यावरून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट (Uddhav Balasaheb Thackeray group) आक्रमक झाला आहे. एक रुपयात पीक विमा या योजनेची नुकसान भरपाईची रक्कम ही १००० रूपयांच्याही खाली असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाशिम येथील पीक विमा कंपनीच्या कार्यलयात (Crop Insurance Company) तोडफोड केली आहे.

Onion Rate । मोठी बातमी! महाराष्ट्रानंतर या ठिकाणीही कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी, एपीएमसीने केंद्राला लिहिले पत्र

या कार्यकर्त्यांनी खुर्च्यांची मोडतोड केली आहे. तसेच या कार्यकर्त्यांनी मालेगाव येथील पीक विमा कार्यालयातील देखील खुर्च्या तोडल्या. कार्यकर्त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला धारेवर धरत कार्यालयातील बॅनरदेखील फाडले आहे. यावरून आता सरकारच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. या घटनेवरून सरकार याची दखल घेते का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Milk Subsidy । केवळ 5 रुपयाच्या अनुदानासाठी बारा भानगडी कशाला? वडेट्टीवारांचा सरकारला सवाल

‘सामना’तुन केली टीका

‘सामना’च्या अग्रलेखात देखील या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका केली आहे. “अन्नदात्या शेतकऱ्यावर आज भटकंतीची वेळ आली असून पीक विम्याच्या नावाने ढोल पिटणाऱ्या सरकारच्या नावाने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहेत. ‘आमचे रक्त घ्या आणि आम्हाला अन्न द्या,’ असे शेतकरी म्हणत आहे. शेतकऱ्याची ही आवस्था सरकारी दावे किती पोकळ आहे हेच दाखवून देत आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

Cow Milk Increase Tips । दूध उत्पादनात घट झालीय? आत्ताच करा ‘हे’ घरगुती उपाय, उत्पादनात होईल मोठी वाढ

जर पीक विम्याचा लाभच शेतकऱ्यांना मिळत नसेल तर या योजनेला काय अर्थ आहे असा सवाल ठाकरे गटाने उपस्थित केला आहे. एकिकडे निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्याला खूप मोठा फटका बसत असताना सरकार केवळ चर्चा करत आहे. सरकारच्या अशी घोषणा म्हणजे घोषणांचे बुडबुडे असल्याची टीका ठाकरे गटाने केली आहे.

Success Story । नोकरीला केला जय महाराष्ट्र! फळशेतीतून हा शेतकरी कमावतोय लाखो रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *